Diwali 2022: दिवाळीचा सण आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. कोविडमुळे दोन वर्षांच्या निर्बंधानंतर या वर्षी लोकांमध्ये सणाबद्दल वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे. हा सण खूप आनंद आणि उत्सव घेऊन येतो यात शंका नाही, पण त्याचबरोबर खाण्यापिण्यावरही लक्ष ठेवले पाहिजे.जास्त तळलेले आणि साखरयुक्त पदार्थ खाल्ल्याने तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो आणि त्यामुळे अचानक वजन वाढू शकते. मिठाई आणि अनेक पदार्थांमध्ये असलेले पीठ आणि साखर यामुळे पित्तांचा त्रास होवू शकतो, पोटाच्या समस्या उध्दभवू शकतात. यासाठी यादिवाळीत गोड खाताना विचारपूर्वक खा. विशेषकरून मिठाई खाताना कंट्रोल ठेवा.
गोड खाल्ल्याने कधी त्रास होतो?
मिठाईमध्ये साखर आणि मैद्याचे प्रमाण खूप जास्त असते.यामध्ये साधे कार्ब आणि ग्लायसेमिक इंडेक्स देखील जास्त प्रमाणात असतात. ज्यामुळे आरोग्यावर परिणाम होवू शकतात. त्यामुळे मिठाई खाताना प्रमाणात खावा.
दिवाळीत मिठाई घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?
दुधाची मिठाई निवडा
दुधात प्रथिने आणि चरबी असते.त्यामुळे मिठाईमध्ये क्रीम वापरली तरी त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो. त्यामुळे बिस्किट,केक ऐवजी दुधाची मिठाई घ्या.रस मलाईमध्ये दूध वापरले जाते,तर केकमध्ये भरपूर साखर आणि मैदा टाकला जातो.त्यामुळे चरबीचे प्रमाण जादा वाढते. म्हणून मैदा असणारे पदार्थ खाण्यापेक्षा दुधाचे पदार्थ खावा.
फायबर युक्त मिठाई निवडा
बेसनमध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते. याउलट बाजरीमध्ये फायबरचे प्रमाण बेसनपेक्षा थोडे कमी असते.त्यामुळे नाचणी किंवा मैद्याच्या पिठाच्या लाडू ऐवजी बेसनाचे लाडू निवडा.
नैसर्गिक साखर मिठाई निवडा
प्रत्येक मिठाईत साखर ही असतेच त्यामुळे खरेदी करताना नैसर्गिक साखर असणारी मिठाई कोणती असा प्रश्न तुम्हाला निश्चितच पडू शकतो. यासाठी तुम्ही खजूराचा वापर केलेली मिठाई निवडा. ज्यामध्ये साखरेचे प्रमाण कमी असते. खजूरामध्ये फायबरचे प्रमाण जादा असते. योग्य प्रमाणात खाल्यास तुमच्या आरोग्यावर परिणाम होणार नाही.
जास्त खाऊ नका
आपल्यापैकी बहुतेकांचा सण-उत्सवांमध्ये अति खाण्याकडे कल असतो. यामुळे वजन वाढू शकते. यासाठी आपल्या आहारावर लक्ष ठेवा आणि थोडे थोडे खा.त्यामुळे तुमच्या आरोग्यावर सणाचा परिणाम होणार नाही.
Disclaimer : वरील बातमीत दिलेली माहिती सर्वसाधारण माहितीवर आधारीत आहे. अधिक माहितीसाठी डाॅक्टरांचा सल्ला घ्या.
Previous Articleगांधीनगर पोलिसांचा नादच खुळा, कर्तव्यासाठी काय पण; सर्वसामान्यांच्यातून कौतुकाच्या प्रतिक्रिया
Next Article PM मोदींवर आत्मघातकी हल्ल्याचा कट, अलर्ट जारी
Related Posts
Add A Comment