शाइनी आणि सिल्की केस सर्वच स्त्रियांना आवडतात.आणि यासाठी स्त्रिया पार्लरमध्ये जाऊन हेअर स्पा करून घेतात.पण पार्लरमध्ये पैसे खर्च करण्यापेक्षा घरच्या घरी हेअर स्पा करून केसांना शाइन आणता येते. तसेच यामुळे केसही सिल्की होतात. शिवाय हा घरगुती स्पा असल्यामुळे केसांचे नुकसान ही होत नाही.कोणताही कार्यक्रम किंवा सणादिवशी हा हेअर स्पा पटकन करता येतो. म्हणूनच हा स्पा कशापद्धतीने करायचा हे जाणून घेऊयात.
ऑलिव्ह ऑइल स्पा
ऑलिव्ह ऑईल हे उत्तम कंडिशनर आहे. हे केसांना हायड्रेट करते. हा स्पा करण्यासाठी ऑलिव्ह ऑईलने केसांना मसाज करा. यानंतर कोमट पाण्यात एक टॉवेल भिजवून तो पिळून घ्या. ते केसांवर गुंडाळा. १० मिनिटे असेच राहू द्या. त्यानंतर केसांना शॅम्पू करा.
दही स्पा
दही केसांसाठी खूप चांगले कंडिशनर म्हणून काम करते. दह्यात ऑलिव्ह ऑईल किंवा खोबरेल तेल मिक्स करा आणि फेटून घ्या. जर ते खूप घट्ट वाटत असेल तर तुम्ही त्यात थोडे दूध घालू शकता. आता ते केसांच्या छोट्या छोट्या बटा घेऊन त्यावर नीट लावा. अर्धा तास तसंच राहू द्या आणि नंतर शॅम्पूने धुवा.
एलोवेरा स्पा
कोरफडीचा ताजा गर घ्या. कोरफड नसेल तर बाजारातील जेल देखील तुम्ही घेऊ शकता. त्यात ऑलिव्ह ऑईल किंवा खोबरेल तेल मिक्स करा आणि फेटून घ्या. केसांची पातळ पातळ लट घ्या आणि मसाज करा. अर्धा तास केसांवर राहू द्या. आता एक टॉवेल कोमट पाण्यात भिजवा आणि १० मिनिटे केसांना गुंडाळा, त्यानंतर शॅम्पू करा.
(टीप – वरील माहिती हि सर्वसामान्य माहितीवर आधारित असून कोणताही उपाय करण्याआधी सौंदर्यतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Previous Articleजिल्हास्तरावर मैदानी खेळात दाणोली विद्यालयाची बाजी
Next Article अमेरिकेने बनवला कृत्रिम सूर्य
Related Posts
Add A Comment