बऱ्याच लोकांना केसांवर वेगवेगळ्या कलरसह प्रयोग करायला आवडतात. पण केसांवर वारंवार कलर केल्याने केस खराब होतात. त्याचसोबत केसगळण्याची समस्याही उद्भवू शकते.अशा परिस्थितीत आज आपण अशा टिप्स पाहणार आहोत, ज्यामुळे केसांचे नुकसान होण्यापासून रोखता येईल.
केसांना कलर केल्यानंतर लगेच शॅम्पू केल्याने केस फ्रिजी होतात. म्हणूनच कलरिंगच्या दुसऱ्या दिवशी शॅम्पू करा. तुम्ही पाण्याने रंग पूर्णपणे स्वच्छ करा. तसेच खूप गरम पाण्याने धुवू नका.
हेअर कलरमुळे प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या दिसू शकतात. काहींचे केस गळतात तर काहींना कोरड्या केसांची समस्या असते. जेव्हा हीटिंग टूल्स वापरली जातात तेव्हा ही समस्या अधिक वाढते. म्हणूनच केसांना सीरम लावा.
कलर केल्यानंतर केसांना पोषणाची गरज असते. म्हणूनच तेल वापरा. केसांना चांगले तेल लावा आणि नंतर धुवा. जर तुमचे केस खूप कोरडे आणि निर्जीव असतील तर आंघोळीच्या ३ ते ४ तास आधी तेल लावा. लक्षात ठेवा की जास्त रसायने असलेले तेल वापरू नका.
Previous Articleमहाबळेश्वरमध्ये कुटुंबावर जमावाचा धारदार शस्त्राने हल्ला; माजी नगरसेवक ह्ल्ल्यात सामिल
Next Article पुण्यात कलाकारांची ‘सांस्कृतिक गुढी’
Related Posts
Add A Comment