कोल्हापुरातील रस्त्यावर डबल डेकर धावताना पाहिल्यावर अनेकांना २२ वर्षांपूर्वीच्या डबल डेकरच्या आठवणींना उजाळा दिला. मुंबईतील ‘बेस्ट’करिता चाचणीसाठी गेलेली ही ६५ आसन क्षमतेची इलेक्ट्रिक एसी बस चेन्नईला जाताना काहीकाळ शहरात आली होती. मुंबईला चाचणीसाठी गेलेली अशोक लेलॅंड स्विच या कंपनीची ही बस तावडे हॉटेलपासून कावळा नाका येथील बसच्या कंपनीजवळ आली. तिथे काही काळ थांबून पुढे रवाना झाली.यावेळी नागरीकांनी बस पाहण्यासाठी गर्दी केली होती. खासदार धनंजय महाडिक यांनी देखील या बसची पाहणी केली. अशीच बस कोल्हापूरला मिळावी यासाठी महाडिक पयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अत्याधुनिक सुविधा असणारी ही बस कशी असेल याची तुम्हाला उत्सुकता लागली असेल. तुम्ही खाली दिलेल्या छायाचित्रणाच्या माध्यमातून ती अऩुभवू शकता.




