6 डिसेंबर या डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. B.R. Ambedkar ) यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासह अनेक नेत्यांनी अभिवादन केले आहे. आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट करताना या नेत्यांनी बाबासाहेबांच्या कार्याला उजाळा देउन त्यांच्या स्मृतीचे स्मरण केले.

ट्विटरवर पोस्ट करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणाले “महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहतो आणि त्यांनी देशासाठी केलेल्या अनुकरणीय सेवेचे स्मरण करतो. त्यांनी आपल्या संघर्षाने लाखो लोकांना आशा दिली. भारताला इतके व्यापक संविधान दिलेल्या कार्याला कधीही विसरता येणार नाही,” असे पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर लिहिले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (HM Amit Shah) यांनी “बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला न्यायाभिमुख, पुरोगामी आणि सर्वसमावेशक संविधान दिले. ज्याने प्रत्येक वर्गाच्या हक्कांचे संरक्षण सुनिश्चित केले गेले. बाबासाहेबांचे संघर्षमय जीवन, विचार, कर्तृत्व सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. आज त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी मी त्यांचे स्मरण करतो आणि त्यांना नमन करतो.”

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे ( AAP) अध्यक्ष अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal ) यांनीही डॉ. आंबेडकरांच्या स्मृतीस नमन केले. “समाजातील प्रत्येक गरीब, शोषित आणि वंचित घटकांच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी लढणाऱ्या भारतरत्न बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांना त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन,” असे त्यांनी आपल्या ट्विटर पोस्टद्वारे लिहिले आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनीही ट्विटरवर श्रद्धांजली वाहिली असून “आम्ही सर्व प्रथम आणि शेवटी समान आहोत. आपण सर्व प्रथम आणि शेवटी भारतीय आहोत. याच्या विरुद्ध कोणतीही गोष्ट बाबासाहेबांना अमान्य होती आणि त्यांच्या संवैधानिक मार्गावर चालणार्यांना ते मान्य नाही. त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना विनम्र श्रद्धांजली,” असे ते म्हणाले.

बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Sing) यांनी, “त्यांचे विचार आणि आदर्श सर्व भारतीयांसाठीच प्रेरणादायीच नाहीत तर ते नव्या भारताच्या उभारणीचा आधार आहेत” असे ते म्हणाले.