नवी दिल्ली : पीएमएलए (प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट) न्यायालयाने संजय राऊत प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कारवाईवर ताशरे ओढताना जी निरीक्षणे नोंदवली त्याची आठवण करून देत कॉंग्रेसचे जेष्ठ नेते जयराम रमेश यांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टिका केली आहे. इडी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्या तालावर नाचत असल्याचा आरोप त्यांनी केला.
पुढे बोलताना जयराम रमेश म्हणाले, “ईडी ही स्वतंत्र आणि व्यावसायिक संस्था नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या तालावर नाचणारी संस्था आहे, हे सिध्द करण्यासाठी न्यायालयाने मारलेले शेरे पुरेसे आहेत.” याचबरोबर ईडीचा वापर भारतीय जनता पक्षाच्या राजकीय विरोधकांना धमकावण्यासाठी तसेच त्यांना लक्ष्य करण्यासाठी केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. जयराम रमेश यांनी विशेष पीएमएलए न्यायालयाने संजय राउत यांना जामिन मंजूर झाल्यावर त्यांची सुटका झाल्यावर प्रतिक्रिया दिली.
Previous Articleखोट्या केसमध्ये संजय राऊत यांना पुन्हा अटक होऊ शकते- उद्धव ठाकरे
Related Posts
Add A Comment