Educational and sports materials along with food to mentally retarded schools
सावंतवाडी तालुका केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनच्यावतीने आरोस दांडेली येथील माऊली मतिमंद निवासी विद्यालयाला अन्नधान्यासह शैक्षणिक व क्रिडा साहित्याचे वितरण करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे सावंतवाडी तालुका प्रतिनिधी तथा सावंतवाडी शहरातील बांदेकर मेडिकल स्टोअर्सचे मालक विद्यानंद उर्फ नंदू बांदेकर यांचे नुकतेच आकस्मित निधन झाले. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ या साहित्याचे वितरण करण्यात आले.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष आनंद रासम, जिल्हा सदस्य सचिन मुळीक, सावंतवाडी तालुका सचिव संतोष राणे, अमर गावडे, सुहास गावडे, श्री मुळीक, कै नंदू बांदेकर यांचे सुपुत्र शुभम बांदेकर आदी उपस्थित होते.
यावेळी यावेळी माऊली मतिमंद निवासी विद्यालयाचे मुख्याध्यापक रुपेश सावंत यांनी विद्यालयाची गरज ओळखून अन्नधान्यासह शैक्षणिक व क्रिडा साहित्याचे वितरण केल्याबद्दल सावंतवाडी तालुका केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनचे आभार मानले.यावेळी माऊली मतिमंद निवासी विद्यालयाचे मुख्याध्यापक रुपेश सावंत, शिक्षक प्राणेश नाईक, क्रीडा निर्देशक नंदिनी आचरेकर, क्राफ्ट शिक्षिका सरोज चव्हाण, कर्मचारी नंदा सावंत, अधीक्षक सुलक्षणा कोकरे, सविता मोरजकर, रामचंद्र गोडकर, नम्रता सावंत आदी उपस्थित होते.
ओटवणे प्रतिनिधी