मणेराजूरी / वार्ताहर
Eicher Tempo Burning In Manerajuri : मणेराजूरीत रविवारी रात्री आयशर टेम्पोंचा बर्निंग थराराने ग्रामस्थांच्या काळजाचा ठोका चुकला. ग्रामस्थांच्या प्रसंगावधाने टेम्पों ड्रायव्हरचा प्राण वाचला परंतु ,आयशर टेम्पो द्राक्षाच्या क्रेटसहीत जळून खाक झाला.यामध्ये सुमारे पंधरा ते वीस लाखाचे नुकसान झाले.
याबाबतची घटना अशी की, मणेराजूरीतील भवानी रोडवर अनिल चव्हाण यांच्या घरात पश्चिम बंगाल येथील झेंडू नामक द्राक्ष व्यापारी रहातो.त्याचेकडे दररोज द्राक्ष गाडयांची आवक जावक होत असते. रविवारी रात्री दहाच्या दरम्यान पश्चिम बंगालला द्राक्षे पोहचवून आयशर टेम्पोत ड्रायव्हर झोपला. रात्री अकराच्या दरम्यान या टेम्पोला अचानक आग लागली.
टेम्पोत असणाऱ्या क्रेटला सुरवातीला आग लागली. बघता-बघता आगीने रौद्र रूप धारण केले. या आगीत लिंबाचे झाड देखील जळून खाक झाले. परिसरात राहणाऱ्या ग्रामस्थांना आगीचे लोट दिसताच त्यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. केबिनमध्ये झोपलेल्या ड्रायव्हरला हाका मारण्याचा प्रयत्न केला झोपेत असणाऱ्या ड्रायव्हरला हाका ऐकू आल्या नाहीत शेवटी प्रसंगवधान राखून समोरची काच फोडून किरण जमदाडे, संजय पाटील,राहूल जमदाडे,सतीश जमदाडे,किशोर जमदाडे व दलालाकडील आदी युवकांनी त्याला बाहेर काढत पाण्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. सर्वांच्या अथक प्रयत्ननाने आग आटोक्यात आली. सुमारे शंभर ते दीडशे लिटरच्या डिझेलच्या टाकीजवळ आगीच्या ज्वाला जात होत्या. या टाकीचा स्फोट झाला असता तर मोठा अनर्थ घडला असता. या विचारानेच ग्रामस्थांच्या काळजाचा ठोका चुकला .
तासगाव नगरपालिकेच्या अग्निशामकला ग्रामस्थांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु, संपर्क होऊ शकला नाही. शेवटी पोलीस पाटील दिपक तेली यांनी तासगाव पोलीसांना पाचारण केले व त्यांचे मार्फत अग्निशामकची गाडी बोलावून आग आटोक्यात आणली.तासगाव पोलीसांचे बजरंग थोरात व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी करुन पंचनामा केला.
Trending
- रस्ते कामात भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्याला बडतर्फ करा; मनसेचे जिल्हा परिषद सीईओंना निवेदन
- कोल्हापूरच्या फुटबॉलमधून परदेशी खेळाडूंचे पॅकअप !
- Ratnagiri : बांधकाम मंत्र्यांच्या दौऱ्यादिवशी महामार्गावर अपघात, महिला जखमी
- मुंबई- गोवा महामार्गाची एक लेन डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होईल- मंत्री रवींद्र चव्हाण
- तू स्माईल अँबेसिडर झालास…पण त्यांचं हसू हिरावून घेतलंय; क्लाईड क्रास्टो यांचा सचिनसाठी संदेश
- शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी शिवभक्तांना अडवू नये
- 25 हजाराची लाच घेताना पारगांव ग्रामीण रुग्णालयाचा कर्मचारी मुलास ताब्यात; सहायक अधीक्षकांवरही गुन्हा दाखल
- भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी शौमिका महाडिक यांची निवड