सांगली: स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त १५ जुलैपासून ७५ दिवस १८ ते ५९ वर्षे वयोगटातील नागरिकांना सरकारी लसीकरण केद्रांमध्ये बूस्टर डोस मोफत देण्यात येणार आहे. जिल्ह्यात बुस्टर डोससाठी पात्र लाभार्थ्याची संख्या ८ लाख ५० हजार आहे. या लाभार्थ्यांच्या लसीकरणासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत तयारी करण्यात आली आहे.
कोरोना प्रतिबंधाचे पहिले दोन डोस घेतल्यानंतर आणि नऊ महिन्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर बुस्टर डोस देण्यात येतो. सध्या जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे १८ ते १९ लाख आहे. तसेच बुस्टर डोस घेण्यासाठी पात्र लाभार्थी संख्या ८ लाख ५० हजार आहेत. काही दिवसापासून खबरदारी म्हणून हेल्थ वर्कर आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना आरोग्य केंद्रांमध्ये मोफत बुस्टर डोस देण्यात आला आहे. ६० टक्के हेल्थ वर्कर आणि ५० ते ५५ कर्मचाऱ्यांनी आणि ५० टक्के फ्रंटलाईन वर्कर कर्मचाऱ्यांनी बुस्टर डोस घेतला आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांचे लसीकरण अद्याप सुरू आहे. १८ ते ५९ या वयोगटातील नागरिकांना बुस्टर डोस घेण्यासाठी खासगी रुग्णालयात पैसे द्यावे लागत होते. आता शुक्रवारपासून मोफत बुस्टर डोस देण्यात येणार आहेत.
हेही वाचा- सांगलीत पाणीटंचाई; टँकरने पाणीपुरवठा, नागरिक संतत्प
जिल्ह्यातील रुग्णालयांची संख्या
जिल्ह्यातील आरोग्य केंद्र- ६४
प्राथमिक ग्रामीण रुग्णालय- १२
उपजिल्हा रुग्णालय- 3
तसेच मनपा क्षेत्रातील आरोग्य केंद्रांमध्ये याची व्यवस्था करण्यात आली आहे.
Previous Articleसुजल मुरकुटे याचा नवा प्रकल्प
Next Article किश्तवाडमध्ये उभारला 100 फुटी ध्वजस्तंभ
Related Posts
Add A Comment