संबंधीत कंपन्यांना सरकारकडून सूचना : नवे नियम लागू होण्याचे संकेत
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळय़ा कंपन्या इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणत असल्याचे दिसून येत आहे. मात्र काही दिवसांपासून सदरच्या स्कूटर्सना आग लागत असल्याचे पहावयास मिळत आहे. यामुळे सरकारकडून आता नवीन इलेक्ट्रिक स्कूटर सादर करण्यासंबंधी नवे नियम लागू करण्याचे संकेत आहेत.
दुसऱया बाजूला मात्र कंपनीने आग लागण्याच्या घटनांची संपूर्ण माहिती घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तर सुत्रांच्या माहितीनुसार रोड, ट्रान्स्पोर्ट आणि हायवेज मंत्रालयाने यासंबंधी इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करणाऱया कंपन्यांसोबत बैठक बोलाविण्यात आली होती. यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांना आग लागणे तसेच अन्य बाबींवर चर्चा करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
संबंधीत घटनांचा परिणाम
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मागील आठवडय़ात वाहन कंपन्यांनी अशा प्रकारची वाहने परत मागविली पाहिजेत असे म्हटले होते. यामुळे सध्या ओला, ओकिनावा आणि प्योर ईव्ही यांनी जवळपास 7,000 इलेक्ट्रिक वाहने आपल्याकडे परत मागवली आहेत.
दंड आकारणी होऊ शकते?
अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार अशा प्रकारे जर वाहने परत घेण्यासोबतच कंपन्या मोटार वाहन कायद्यानुसार संबंधीत कंपन्यांनी या प्रकारच्या चुका केल्यास संबंधीत वाहन निर्मिती करणाऱया कंपन्यांना दंड आकारणी करण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले आहे.