लखनौ ः
लखनौहून कोलकात्याला जाणाऱया एअर एशियाच्या विमानाचे रविवारी इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. विमान नुकतेच उड्डाण घेत असताना अचानक एका पक्ष्याला धडकले. त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव हे विमान लखनौमध्येच परत उतरवण्यात आले. यानंतर प्रवाशांना दुसऱया विमानाने कोलकाता येथे पाठवण्यात आले. सदर विमानात कोणतीही तांत्रिक समस्या निर्माण न झाल्याचे प्राथमिक पाहणीत आढळून आले होते. मात्र, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सावधगिरीची उपाययोजना म्हणून पर्यायी विमानाची व्यवस्था एअर एशिया प्राधिकरणाकडून करण्यात आली.