वृत्तसंस्था/ रायपूर
छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यात रविवारी सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन जवान जखमी झाले. दोन्ही जखमींना उपचारासाठी विजापूरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या चकमकीत 3-4 नक्षलवादीही जखमी झाल्याचे वृत्त आहे. गोपनीय सूत्रांकडून नक्षलवाद्यांच्या वावराविषयी माहिती मिळाल्यानंतर हाती घेण्यात आलेल्या विशेष मोहिमेदरम्यान ही चकमक झाल्याची माहिती सुरक्षा सूत्रांकडून देण्यात आली. सुरक्षा जवानांच्या कारवाईची कुणकुण लागताच नक्षलवाद्यांनी गोळीबार करत आपल्या आश्रयस्थानावरून पोबारा केला. यावेळी झालेल्या संघर्षात दोन्ही बाजूने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी काहीजण जखमी झाले आहेत.