कोल्हापूर : संतोष पाटील
नुकत्याच प्रसिध्द झालेल्या राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात कोल्हापूर जिह्याचे दरडोई वार्षीक उत्पन्न 1.77,926 कोटीवरुन 2,08,884 कोटीवर झेपावले. मागील दहा वर्षापासून कोल्हापूरची आर्थिक विकासाची गाडी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या शहरांच्या पाठोपाठच आहे. यानिमित्ताने राजकीय अनास्था, कालच्या अन् आजच्या सक्षम राजकीय नेतृत्वाच्या अभावामुळेच कोल्हापूरच्या विकासाला कोलदांडा दाखवण्याची हिंमत होत असल्याची चर्चा सुरू झाली. आपली राजकीय ताकद जिह्याच्या विकासासाठी वापरु शकेल असा नेताच नसल्याने महामार्गामुळे महापुरात होणारी अडवणूक, शास्वत शेतीतून उत्पन्नाला खो, इंडीस्ट्रीयल कॅरिडॉर, पुणे-कोल्हापूर-मुंबईसह कोकण रेल्वेसह विमानसेवांचे जाळे, आदी प्रकल्प रखडले. परिणामी जिह्याच्या विकासालाच खो बसला. उद्यमशिलता हाच कोल्हापूरचा स्थायी असल्याने आर्थिक उतुंगता दिसते, पाठबळाअभावी तो किती काळ राहिल हा खरा मुद्दा आहे.
सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, नागपूर, लातूर सारख्या शहरातून राज्य आणि देश पातळीवरील नेते घडले. मात्र, कोल्हापुरातील पायात-पाय घालण्याच्या राजकीय प्रवृत्तीने क्षमता असूनही राज्यात प्रभावी ठरेल असे नेतृत्व घडले नाही. सातारा जिह्यातील कराडमधून माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण, पुण्यातून शरद पवार, सांगलीतून वसंतदादा पाटील, सोलापुरातून सुशीलकुमार शिंदे, लातूरमधून विलासराव देशमुख, नांदेडमधून शंकरराव आणि त्यानंतर अशोक चव्हाण, नागपुरातून नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आदी राज्य आणि देशाला दिशा देणारी राजकीयदृष्ट्या कमालीची ताकदवान नेतृत्व पुढे आली. कोल्हापुरात नेतृत्वाची वाणवा नाही. रत्नाप्पा कुंभार, कल्लाप्पा आवाडे, डी. वाय. पाटील ते सतेज पाटील, सदाशिवराव मंडलिक, बाळासाहेब माने, उदयसिंगराव गायकवाड, दिग्वीजय खानविलकर, चंद्रकांत पाटील, संभाजीराजे छत्रपती आदी दोन डझन नावे घेता येतील.
राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा सामाजिक वारसा, ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि नैसर्गिक विपुलता कोल्हापुरात असे सर्व काहीआहे, तरीही येथून राज्याचे नेतृत्व करावे असो नेता का पुढे आला नाही? मोजके प्रसंग वगळता येथील नेतृत्वांनी कधी जिल्हा सोडून विचारच केला नाही. येथील तिव्र राजकीय स्पर्धेमुळे नेते जिह्यातच अडकून पडले. त्यास येथील राजकीय परिस्थितीही कारणीभूत आहे. पायात पाय घालण्याच्या राजकारणामुळे येथील नेत्यांमध्ये राज्याचं नेतृत्व करण्याची धमक असूनही ते खुजे ठरले. राज्यात आणि केंद्र सरकारकडे आपली राजकीय ताकद वापरून जिह्यासाठी योजना खेचून आणण्यात अपयशी ठरले. उद्यमशिलता असूनही उद्योगधंद्याच्या बाबती कोल्हापूरची पाटी कोरीच राहिली. सक्षम राजकीय नेतृत्व असेल तर त्या जिह्याचा चौफेर विकास होत असल्याचे शेकडो उदाहरणे आहेत. केंद्र आणि राज्यात आपली राजकीय ताकद आणि दबाव वापरुन कोल्हापुरला निधीसह योजना खेचून आणण्यात कमी पडत असल्याने जिह्याच्या विकासाला दिवसेंदिवस खो बसत आहे.
सामाजिक वातावरणाचा परिणाम
एका बाजूला राजर्षी शाहू यांचा समग्र वैचारिक वारसा सांगणारे कोल्हापूर उद्योग आणि विकास यात वैचारिकदृष्ट्या कमी पडत असल्याची खंत आहे. खाबूगिरी आणि विविध कृती समितींच्या आडाने होण्राया त्रासामुळे मोठा प्रकल्प येण्यास खासगी कंपन्या धजावत नाहीत. मागील दहा वर्षात कागल एमआयडीतून मोठ्या प्रकल्पांची फेज टू थांबवली तसेच अनेकांनी काढता पाय घेतला. खो घालण्याच्या प्रवृत्तीमुळे खासगी सरकारी गुंतवणूक येण्यास अडचण ठरत आहे.
शेतीतील प्रयोग संपले
शेतीपूरक हवामान, मुबलक पाणी, दर्जेदार सुपिक जमिन, शेतीमालावर प्रक्रिया केंद्रांची सोय, रस्ते, विमान, रेल्वेसह दळवणाची सुविधा, हक्काची बाजारपेठ आदी व्यवसायपूरक सर्व काही बाबी असूनही कोल्हापुरातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या वंचितच राहिला आहे. बदलत्या वातावरणामुळे सलग चार ते पाच महिने पाऊस, अतिवृष्टी आणि ढगफुटीचे संकटातून सुटका होण्यासाठी ऊस, साखर आणि गुळ यापलिकडे शेती उत्पादनाकडे पाहण्याची गरज आहे. पाण्याची मुबलकता गेल्या चार दशकात मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली. धरणे, तलाव, विहीरी कायान्वित झालीत. परिणामी कोल्हापुरात जिह्यात 3 लाख 65 हजार 876 हेक्टर पिकाखालील क्षेत्रापैकी सर्वाधिक एक लाख 70 हजार हेक्टर क्षेत्रात ऊस लागला.तरीही काही वर्षापासून शास्वत उत्पादन मुल्य हाती पडत नसल्याने बळीराजा धास्तावला आहे. ठिबक सिंचन, टिश्यु कल्चर, रासायनिक खते, पेस्टीसाईड आणि तंत्रज्ञानावर तयार करण्यात आलेली आणि एकरी भरघोस उत्पादने देणारी आधूनिक बि-बियाणे बाजारात आहेत. ज्वारी, बाजरी, बीटी कपाशी, मूग, भुईमूग, तूर, चवळी, केळी आणि या सोबतच मुळा, गाजर, शेवगा, टोमॅटो, पपई, द्राक्ष,वांगी, भेंडी, ग•ागोबी, फुलगोबी, हिरवी मिरची यांचे भरघोस उत्पादन देणारी संकरीत बियाणे, टिश्यु कल्चर रोपे उपलब्ध आहेत. मात्र कोल्हापूरी शेतकरी ऊस या नगदी आणि आळशी पिकाच्या प्रेमातून बाहेर पडलाच नाही.
शेती आणि कोल्हापूर
दृष्टीक्षेप (हेक्टर अंदाजित)एकूण क्षेत्र 3.93 लाख
ऊस – 1.70 लाख
भात – 1.20 लाख
सोयाबिन – 54 हजार
भुईमुग – 51 हजार
नाचणी – 19 हजार
ज्वारी – 11 हजार
दूधाचा आधार
2018 मध्ये जिह्यात सरासरी 22 लाख 9 हजार 529 लिटर प्रमाणे संकलन झाले. 2019मध्ये 16 लाख 41 हजार 345 लिटर इतके झाले. 2019च्या महापूरापूर्वी मागील वर्षी जुलै महिन्यात 15 लाख 71 हजार 191 लिटर होते, ते जुलै 2019मध्ये 18 लाख 493 इतके होते. 18 लाख 87 हजार 497 लिटरपर्यंत आहे. घरातील वापरासह कोल्हापुरात साधारण रोज तीस लाख लिटर दूधाची निर्मिती होते. दुधातून महिन्याला तीनशे कोटी रुपयांची उलाढाल ग्रामीण जिह्यात होते. घरगुती दूध उत्पादनाला व्यावसायिक दर्जा देवून तसा प्रयत्न करण्याची गरज आहे.
पाठबळाची गरज
मोठया लघु उद्योगांमध्ये ऑटो स्पेयर पार्ट्स, कास्टिंग काम, इंजिनिअरिंग वर्क्स, डिझेल इंजिन, रौप्य अलंकार आणि कोल्हापुरी चप्पल्सचे उत्पादनाचा वाटा आहे. कोल्हापूर जिह्यात सुमारे तीनशे फाऊंड्री युनिट असून औद्योगिक व निर्यात क्षेत्रात दरवर्षी सुमारे 15 अब्ज इतका वाटा आहे. “महाराष्ट्र शासनाचा मँचेस्टर“ म्हणून ओळखले जाणारे इचलकरंजी जवळजवळ पाच हजार टेक्क्सोले कारखाने आहेत आणि एसएमएसाठी भारतातील सर्वात मोठे केंद्र म्हणून ओळखले जाते. सोने-चांदी उद्योगात उद्योगात दरवर्षी कोट्यावधीचा वार्षिक उलाढाल होते. मात्र पारंपरिक उद्योगला शासनाचे पाठबळ कमी पडत असल्याचे वास्तव आहे.
Related Posts
Add A Comment