Kolhapur Ganpati Visarjan 2022 : गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या…अशा जयघोषात घरगुती गणपतीला निरोप देण्यात आला.. यंदा पर्यावरणपूरक घरगुती गणेश विसर्जनाला उपनगरात प्रतिसाद मिळाला. फुलेवाडी रिंग रोडवरील बोंद्रे नगर येथील कारीआई तरुण मंडळ आणि विजय उर्फ रिंकू देसाई युवा मंच यांच्या वतीने पर्यावरण पूरक जलकंड उभारून घरगुती गौरी गणपती विसर्जन सोहळा पार पडला. यावेळी या जलकुंडात 170 हून अधिक बाप्पाच्या मूर्ती विसर्जित करण्यात आल्या.



