आमदार प्रवीण आर्लेकर यांची माहिती, वाढदिनी विविध कार्यक्रम
पेडणे / प्रतिनिधी
गोरगरिबाच्या कल्याणासाठी स्वर्गीय प्रभाकर आर्लेकर ट्रस्टची स्थापना केली असून ज्या ज्या गरजवंतांना लागणारी मदत या ट्रस्टमार्फत केली जाईल, अशी ग्वाही पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी दिली. गुरुवारी पेडणे कार्यालयात आयोजित स्वर्गीय प्रभाकर आर्लेकर ट्रस्टच्या स्थापना व उद्घाटन सोहळय़ात ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर भाजप मंडळ तुळशीदास गावस, अध्यापन नगराध्यक्ष माधव सीनाई देसाई, उपनगराध्यक्ष तृप्ती सावळ देसाई, नगरसेविका उषा नागवेकर, नगरसेविका अश्विनी पालयेकर, नगरसेविका विशाखा गडेकर, नगरसेविका राखी कशालाकर, नगरसेवक सिद्धेश पेडणेकर, नगरसेवक शिवराम तुकोजी, तोरसे माजी सरपंच सूर्यकांत तोरस्कर, तोरसे माजी सरपंच तथा उपसरपंच उत्तम वीर, कंत्राटदार महेश परब, पोरस्कडे सरपंच निशा हळणकर, कृष्णा पालयेकर, धारगळ माजी सरपंच भूषण उर्फ प्रदीप नाईक, पंच सतीश धुमाळ, माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश सावळ, कृष्णा पालेकर, धारगळ सरपंच अनिकेत साळगावकर, मोपा सरपंच सुबोध महाले, चांदेल माजी सरपंच संतोष मळीक आदी उपस्थित होते.
प्रभाकर आर्लेकर ट्रस्ट स्थापन करण्यामागचा मूळ उद्देश आहे की, पेडणे मतदार संघातील गरजवंतांच्या असलेल्या काही अडचणी या ट्रस्टमार्फत सोडवण्याचा विचार आहे. आपले वडील स्वर्गीय प्रभाकर आर्लेकर यांच्या नावाने या ट्रस्टची स्थापना केली आहे. ती केवळ पेडणे मतदारसंघातील गरजवंतांना मदत करणे असा मूळ उद्देश असणार आहे. या ट्रस्टची गरजवंताना गरज लागेल, त्या त्या वेळी लाभ घ्यावा असे आवाहन आमदार प्रवीण आर्लेकर यांनी यावेळी केले.
लोकप्रिय ठरत असलेले आमदार प्रवीण आर्लेकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्ताने आपल्या वडिलांच्या नावे प्रभाकर आर्लेकर ट्रस्ट स्थापन करून जनतेच्या कल्याणासाठी उपक्रम राबवलेला आहे. तो उपक्रमाचा अनेकांना लाभ होणार असून त्याचा लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन तुळशीदास गावस यांनी केले.
यावेळी आमदार प्रवीण आर्लेकर यांनी तुये येथील विशेष मुलांच्या आत्मविश्वास विद्यालयाला भेट देऊन आपला वाढदिवस केक कापून साजरा केला. यावेळी मुलांसाठी जादूचा मनोरंजक कार्यक्रम आयोजित केला होता. याचबरोबर तुये येथील सामुदायिक आरोग्य केंद्राला भेट देऊन तेथील रुग्णांची विचारपूस करत रुग्णांना फळांचे वाटप केले. त्यानंतर तुये येथील डॉन बॉस्को विद्यालयाला भेट दिली. तसेच नारेरवाडा येथील वृध्दाश्रमाला भेट देऊन फळांचे वाटप केले.