Expectation from the media to strengthen democracy more and more!
ज्येष्ठ पत्रकार अमेय तिरोडकर यांनी व्यक्त केले मत
लोकशाहीला अधिकाधिक मजबूत करण्याचकरण्याची अपेक्षा माध्यमांकडून आहे .लोकशाहीमुळे माध्यमे आहेत , त्यांचे अस्तित्व आहे .लोकशाहीमुळे माध्यमांना सन्मान आहे .मात्र सध्याच्या परिस्थितीत लोकशाहीलाला गिळकृत करण्याचे काम बहुतांशी माध्यमंकडून होत आहे तशी परिस्थिती माध्यमांकडून निर्माण केली जात आहे. चीन सारखी एक पक्षीय राजवट आणण्याची परिस्थिती निर्माण केली जात आहे .लोकशाहीवर ,संविधानावर प्रेम करणाऱ्या आणि विश्वास असणाऱ्या नागरिकांनी विचारवंतानी या विरोधात लढाई लढण्याची गरज आहे. असे मत ज्येष्ठ पत्रकार अमेय तिरोडकर यांनी श्रीराम वाचन मंदिरात आयोजित देशभक्त प्रभाकर पंत कोरगावकर व्याख्यानमालेचे तिसरे पुष्पगुच्छ गुंफताना व्यक्त केले. लोकशाही समोर माध्यमांचे आव्हान हा त्यांचा विषय होता. अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार विजय शेट्टी होते तर यावेळी प्राध्यापक प्रवीण बांदेकर, जि.ए. बुवा ,रमेश बोंद्रे ,राजेश मोंडकर ,बाळा बोर्डेकर संदीप निंबाळकर आदी उपस्थित होते.
सावंतवाडी / प्रतिनिधी