Homemade Hair Oil: हिवाळ्यात त्वचेसोबत केसांच्याही अनेक समस्या जाणवतात. केसात कोंडा होणे, केस गळणे, केस कोरडे होणे अशा बऱ्याच समस्यांमुळे त्रास होतो. मग यापासून सुटका मिळवण्यासाठी अनेकदा केसांना तेल लावण्याचा सल्ला दिला जातो. पण केसांना कोणते तेल लावायचे हा प्रश्न नेहमीच पडतो.अशावेळी घरच्या घरी बनवलेलं हे तेल नक्कीच उपयुक्त ठरू शकतं. आज आपण ते कसे बनवायचे हे जाणून घेणार आहोत.
साहित्य
खोबरेल तेल – ५००मिली
कढीपत्ता – १५ ते २०
मेथी दाणे – अर्धा चमचा
जास्वंदाची फुले – ८ ते १०
कडुलिंबाची पाने – १५ ते २०
कांदे – २
कोरफडीचे पान – १
कृती
हे तेल बनवण्यासाठी प्रथम मेथी दाणे अर्धा तास पाण्यात भिजत ठेवा आणि तोपर्यंत कोरफडीचे छोटे तुकडे करा. मेथी दाणे चांगले भिजल्यावर वरील सर्वगोष्टी एकत्र बारीक करा.आता शुद्ध खोबरेल तेल गरम करून त्यात ही पेस्ट घाला. रंग बदलेपर्यंत सुमारे ४५मिनिटे कमी गॅसवर तेल गरम करा. नंतर थंड होऊ द्या आणि गाळून काचेच्या बाटलीत ठेवा.
टीप – वरील सर्व माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित असून कोणताही उपाय करण्याआधी सौंदर्यतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा
Previous Articleतेरेखोल नदीवरील ओटवणे पुलाला जोडणारा रस्ता खचला
Next Article चित्रा वाघ यांची उर्फी जावेदला अटक करण्याची मागणी
Related Posts
Add A Comment