ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन देणं नवी मुंबईतील दोन बड्या नेत्यांना भोवलं आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले आणि राज्य पर्यावरण समितीचे अध्यक्ष विजय नाहटा या दोन नेत्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.
सत्तानाटय़ानंतर मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिंदे गटाला प्रमुख शहरांसह विविध भागातून पाठिंबा मिळत आहे. ठाणे, नवी मुंबईनंतर काल कल्याण-डोंबिवलीमधील नगरसेवकांनीही शिंदेच्या सोबत राहण्यास पसंती दर्शवली. त्यामुळे शिंदे गटाला पाठिंबा देणाऱ्या नेत्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास शिवसेनेने सुरूवात केली आहे. विजय चौगुले, विजय नाहटा या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
हेही वाचा : महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री, राऊतांचा शिंदेंना टोला
गुरुवारी विजय चौगुले, विजय नाहटा या दोन्ही नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला होता. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत या दोन्ही नेत्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
हेही वाचा : एलन मस्क यांनी का रद्द केला ट्विटर खरेदी करार?