१२ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले
खटाव पंचायत समितीचा विस्तार अधिकारी संजय विलासराव सोनावले (रा. समर्थ सदन, सातारा, मूळ रा. खंडोबाची पाली ता. कराड जि. सातारा) याला १२ हजारांची nलाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, तक्रारदार हे ग्रामसेवक असून त्यांना संजय सोनावले हे कार्यालयीन कामकाजात शुल्लक चुका काढून तक्रारदार यांना मानसिक छळ करत होते. तसेच तक्रारदार ग्रामसेवक यांचा कसुरी अहवाल वरिष्ठांना पाठवून निलंबित करेन व एका प्रकरणात तक्रारदार यांच्या विरोधात असलेल्या तक्रारीवरुन कारवाई न करण्यासाठी विस्तार अधिकारी संजय विलासराव सोनावले यांनी तक्रारदार यांच्याकडे १२ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. ती स्वीकारतानाच त्याला ताब्यात घेण्यात आले.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक सातारा विभागाच्या पोलीस उपअधीक्षक श्रीमती उज्वल वैद्य, पोलीस नाईक प्रशांत नलावडे, पोलीस कॉन्स्टेबल तुषार भोसले, पोलीस नाईक निलेश चव्हाण, पोलीस नाईक मारुती अडागळे यांनी केली.