प्रतिनिधी /बेळगाव
उद्यमबाग येथील सुशील ऑटो वर्क्स येथे कर्मचारी व कामगारांसाठी मोफत नेत्र चिकित्सा शिबिर घेण्यात आले. यावेळी डॉ. कोडकीणी आय सेंटरचे डॉ. संजय पाच्छापुरे व त्यांच्या सहकाऱयांनी नेत्र तपासणी केली. शिबिराचे आयोजन अशोक गांगोटकर व शशिकांत गांगोटकर यांनी केले होते. शिबिराला गणेश चौगुले यांचे सहकार्य लाभले. यावेळी एकूण 100 हून अधिक जणांची नेत्र तपासणी करण्यात आली.