अभिजीत खांडेकर : तरूण भारत
आज सोशल मिडियावर नेटिझन्सनी फादर्स डे साजरा केला. आपल्या वडिलांप्रती आदर आणि प्रेम व्यक्त करून वडिलांबरोबरचे किंवा स्वत:च्या मुलांबरोबरचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. सेलिब्रेटिंनीही आपले पितृप्रेम दाखवण्यासाठी सोशलमिडीयाचा आधार घेतला. करण जोहर पासून आदित्य नारायण आणि बॉबी देओल पासून आदिनाथ कोठारे पर्यंत सर्वांनीच आपल्या पाल्याविषयी भावना व्यक्त केल्या.
बॉलिवूडमधील सर्वात चर्चित व्यक्ती आणि यशस्वी निर्माता असलेला करण जोहर सध्या परदेश दौऱ्यावर आहे. पण निघण्यापुर्वी करणने आपल्या कुटुंबासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तो न्युजपेपर प्रिंटिंग असलेला असलेला ड्रेस परिधान केला आहे. त्याची दोन्ही मुले रूही आणि यश यांनी सुद्धा या फोटोंना पोझेस दिल्या आहेत. तो फोटोखाली म्हणतो की, “माझ्या डोक्यावर माझ्या आईचा हात आहे. तिचे अथक प्रेम, वेळ आणि आधार नसता तर मी माझ्या हृदयापासून कधीच निर्णय घेऊ शकलो नसतो…ती आमच्या प्रेमाच्या पंखांखालचा वारा आहे.” असे सांगून त्याने आपल्या आईविषयी आपल्या भावना व्याक्त केल्या. तसेच आपल्या दोन्ही मुलांबद्दल “रुही आणि यशला माझ्या आयुष्यात आणल्याबद्दल मी विश्वाचे आभार मानत नाही असा एकही दिवस नाही.” असे सांगून त्याने स्वताला आणि सगळ्या एकल पालकांना (Single Parrents) ‘फादर्स डे’च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या आश्रम या वेबसिरीजमुळे ओटिटी प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक चर्चेत असलेला अभिनेता बॉबी देओल याने आपल्या मुलग्यासोबत एक दिलखुलास फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे. गुरूवारी 21 वर्षाचा झालेला त्याचा मुलगा आर्यमान याला त्याने एंजल म्हटले असून त्यामध्ये तो लिहतो, “Happy Birthday My Engle #21.”
मागील पाच महिने माजी क्रिकेटपटू युवराज सिंगसाठी खूपच वेगळे आणि भावनिकदृष्ट्या विशेष ठरले आहे. युवराजसिंगला मुलगा झला असून त्याचे नाव ओरियन सिंग ठेवले आहे. आपली पत्नी अभिनेत्री हेजल सिंगसह आपल्या पहिल्या मुलाचे स्वागत केले.
आपल्या चंद्रा या चित्रपटाने चर्चेत असलेला मराठी अभिनेता आदिनाथ कोठरे याने फादर्स डेच्या दिवशी त्याचा संपूर्ण दिवस आपल्या चार वर्षांची मुलगी जिजासोबत घालवून जिजाबरोबरचे फोटो शेअर केले.
अभिनेता अपारशक्ती खुराना याने आपण फादर्स डे निमित्त खुपच उत्साही असल्याचे म्हटले आहे. “वडील झाल्यामुळे मला एक चांगली व्यक्ती बनण्याची इच्छा पुर्ण झाली” असे अपारशक्ती खुराना म्हणतो. आपली मुलगी अरजोई सह निवांत क्षणी असलेला एक फोटो त्याने शेअर केला आहे.