उपवासाच्या दिवशी शाबू आणि वरई खाऊन कंटाळा येतो. आणि त्यात जर महाशिवरात्रीसारखा सकाळ-संध्याकाळी उपवास असला तर मग उपवासाला काय खायचं हा प्रश्न पडतो. अशावेळी झटपट आणि पौष्टिक असणारी उपवासाची इडली उत्तम पर्याय आहे. आज आपण ही उपवासाची इडली कशी बनवतात हे जाणून घेऊयात.
उपवासाच्या इडलीचे साहित्य
वरई – १ कप
साबुदाणा – पाव कप
दही – १ कप
जिरे – १ चमचा
बेकिंग सोडा – अर्धा छोटा चमचा
मीठ
पाणी
कृती
सर्वप्रथम साबुदाणा आणि वरई मिक्सरमध्ये वेगवेगळे जाडसर वाटून घ्या.
आता हे मिश्रण एकत्र करून त्यामध्ये दही, जिरे आणि चवीनुसार मीठ, गरजेनुसार पाणी टाकून भिजवा.
आता मिश्रण १५ ते २० मिनिटे झाकून ठेवा.
ठरावीक वेळेनंतर तयार मिश्रणात 1/4 चमचा बेकिंग सोडा घालून मिश्रण नीट एकजीव करा.
आता इडलीच्या भांड्यातील इडली प्लेटला तेल लावा आणि त्यात ते मिश्रण भरा.
आता नेहमीप्रमाणे इडलीपात्रातील इडल्या वाफवून घ्या.
तयार झालेली तुमची उपवासाची इडली नारळाच्या चटणीसोबत सर्व्ह करा.
Previous Articleनिवडणुकांच्या तयारीला लागा…
Next Article असा बनवा जेवणाची लज्जत वाढवणारा भाजी मसाला
Related Posts
Add A Comment