ऑनलाईन टीम / तरुण भारत :
Fifth Vande Bharat train to run on Chennai-Bangalore-Mysore route देशात येत्या 10 नोव्हेंबरपासून पाचवी वंदे भारत ट्रेन सुरु होत आहे. ही ट्रेन चेन्नई-बेंगळूर-म्हैसूर या मार्गावर धावणार असल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.
यापूर्वी 13 ऑक्टोबरला पंतप्रधान मोदींनी चौथ्या वंदे भारत ट्रेनला हिमाचल प्रदेशातील उना रेल्वे स्थानकावरुन हिरवा झेंडा दाखवला होता. ही ट्रेन हिमाचल प्रदेशातील अंब-अंधारा ते नवी दिल्ली दरम्यान नवीन वंदे भारत ट्रेन धावणार आहे. अद्याप सर्वसामान्यांसाठी ती सुरू झालेली नाही. 19 ऑक्टोबरपासून ही चौथी ट्रेन सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात येणार आहे.
अधिक वाचा : शैक्षणिक स्वायत्ततेसाठी थेट यूजीसीकडे अर्ज करता येणार
सध्या देशभरात चार वंदे भारत ट्रेन आहेत. यामध्ये 2019 पासून दिल्ली ते वाराणसी ही ट्रेन सुरु आहे. तसेच दिल्ली ते कटरा, गांधीनगर ते मुंबई आणि दिल्ली ते अंब अंदौरा या ट्रेनचा समावेश आहे. आता देशात चेन्नई-बेंगळूर-म्हैसूर या मार्गावर पाचवी वंदे भारत ट्रेन धावणार आहे.