गणेशोत्सवासाठी दुप्पट दराने तिकीट विक्री
बेळगाव / प्रतिनिधी
गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित व्हावा यासाठी मुंबई, पुणे, हैदराबाद, बेंगळूर येथील आपापल्या गावी परतण्याचा बेत भाविक आखत आहेत. बस व रेल्वेचे बुकिंग फुल्ल झाल्यामुळे खासगी बसेससाठी बुकिंग करण्यात येत आहे. परंतु या संधीचा फायदा उठवत खासगी बसचालकांनी दुप्पट दर आकारणी करण्यास सुरुवात केली आहे. गर्दीचा फायदा उठविला जात असल्याने गावी परतणाऱया गणेशभक्तांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
कोरोनामुळे मागील दोन वर्षांत बरेचजण गणेशोत्सवासाठी गावी जाऊ शकले नाहीत. त्यामुळे यावषी धुमधडाक्मयात गणपती साजरा करण्याची जय्यत तयारी केली जात आहे. बेळगाव परिसरातील हजारो नागरिक नोकरी, व्यवसायासाठी मुंबई, पुणे, हैदराबाद, बेंगळूर या शहरांमध्ये वास्तव्य करीत आहेत. हे नागरिक गणपतीला गावी येणार असल्याने त्यांच्याकडून बुकिंग केले जात आहे. 31 ऑगस्टला गणेश चतुर्थी असली तरी त्यापूर्वी दोन दिवस अगोदर गणेशभक्त गावी दाखल होणार असल्याने शनिवारपासूनचे बुकिंग फुल्ल आहे.
महानगरांमधून गावी परतण्यासाठी पहिले प्राधान्य रेल्वेला दिले जाते. परंतु गणेशोत्सवादरम्यानचे रेल्वे बुकिंग फुल्ल झाल्याने एक तर परिवहन मंडळाची आराम बस अथवा टॅव्हल बुकिंग करावे लागते. परिवहन मंडळाच्या मोजक्मयाच बस असल्यामुळे खासगी ट्रव्हलशिवाय प्रवाशांना पर्याय नसतो. याचाच फायदा खासगी बसचालक उठवित आहेत. सर्वच शहरांच्या तिकिटांचे दर दुप्पटीने वाढविण्यात आले आहेत. त्यामुळे या तिकीट दरांवर आरटीओ प्रशासनाने मर्यादा आणण्याची मागणी होत आहे.
मुंबईसाठी उत्सव स्पेशल रेल्वेची मागणी
गणेशभक्तांच्या सोयीसाठी नैर्त्रुत्य रेल्वेच्यावतीने यशवंतपूर-बेळगाव या मार्गावर उत्सव स्पेशल रेल्वे सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे बेंगळूरहून बेळगावला येणाऱया गणेशभक्तांची सोय झाली. परंतु त्याहून अधिक गणेशभक्त हे मुंबई-पुणे या भागातून येणार असल्याने नैर्त्रुत्य रेल्वे अथवा मध्यरेल्वेने या मार्गावर उत्सव स्पेशल रेल्वे सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांनी वारंवार करूनदेखील रेल्वे विभागाने मागणीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. स्पेशल रेल्वे सुरू केल्यास खासगी ट्रव्हल्स चालकांकडून होणारी आर्थिक लूट थांबविता येणार आहे.
तिकिटांचे दर
ठिकाण | आताचे दर | आधीचे दर |
मुंबई | 1800 ते 3000 | 800 ते 1400 |
पुणे | 1000 ते 1800 | 600 ते 1200 |
बेंगळूर | 1200 ते 2000 | 800 ते 1500 |
हैदराबाद | 2000 ते 3000 | 1500 ते 2000 |