भदोही : उत्तरप्रदेशच्या भदोहीमध्ये रविवारी रात्री दुर्गापूजा मंडपाला लागलेल्या आगीत 5 भाविक होरपळून ठार झाले आहेत. मृतांमध्ये 3 मुलांचा आणि 2 महिलांचा समावेश आहे. व्यासपीठावर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सुरू असताना ही दुर्घटना घडली आहे. व्यासपीठासमोर 200 हून अधिक लोक बसलेले असताना अचानक तेथे आगीची दुर्घटना घडली आहे. या मंडपाला फायबर पॉलिथिनने सजविण्यात आले होते. याच पॉलिथिनने पेट घेतला आणि पंख्यांमुळे केवळ 20 सेकंदांमध्ये आग पूर्ण मंडपात फैलावली. तर मंडपातून बाहेर पडण्यासाठी अरुंद मार्ग असल्याने चेंगराचेंगरीचा प्रकार घडला. आग भीषण असल्याने पूर्ण मंडप जळून खाक झाला आहे. दुर्घटनेनंतर जखमींना उपचारासाठी वाराणसी अन् प्रयागराज येथे हलविण्यात आले, यातील 5 भाविकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 47 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.
Previous Articleन्यूझीलंड अन् ऑस्ट्रेलिया दौऱयावर जाणार जयशंकर
Next Article इराणमध्ये पोलीस प्रमुखाची हत्या
Related Posts
Add A Comment