साटे, देरोडे भागामध्ये नव्याने आगीचे प्रकार, सुरल गावामध्ये नव्याने आगीचे तांडव
उदय सावंत/ मोर्ले
गेल्या सहा दिवसापासून सत्तरी तालुक्मयाच्या अनेक भागांमध्ये आगीच्या वणव्याने खळबळ निर्माण केलेली आहे .गेल्या दोन दिवसापासून सरकारची यंत्रणा आग विझविण्यासाठी तारेवरची कसरत करीत आहे . बुधवारी रात्रीपर्यंत अनेक भागातील आग विझलेली आहे. तरीसुद्धा सुक्मया लाकडांना अजूनही आग असल्यामुळे पुन्हा एकदा आगीचा वणवा निर्माण होऊ शकतो. यामुळे वनखात्याच्या यंत्रणेने वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वनखात्याचे कर्मचारी तैनात केलेले आहेत. ते डोळ्यात तेल घालून जलसंपत्तीची रक्षा करीत असून यासाठी नागरिकांनी त्यांना सहकार्य करावे अशी विनंती वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी केलेली आहे.
दरम्यान वाळपई पोलीस स्थानावर अज्ञाताविरोधात वनाधिकाऱ्यांनी तक्रार दाखल केलेली आहे.वेगवेगळ्या ठिकाणी आगी लावण्याचे प्रकार यामध्ये अज्ञाताचा हात असू शकतो. यातून मोठ्या प्रमाणात जैविक संपत्तीचे हानी झालेली आहे. यामुळे अज्ञातावर वनसंवर्धन कायदे अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. वाळपई पोलीस ही तक्रार दाखल करून करून घेतली आली असून त्या संदर्भात चौकशी करण्यात येत आहे. या संदर्भाच्या धागेदोरा मिळाल्यास गुन्हेगारापर्यंत निश्चितच पोहोचू अशी आशा पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेली आहे. दरम्यान आजही देरोडे गावामध्ये असलेली आग विझविण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला. त्याचप्रमाणे गावातील नागरिकांनी या कार्यामध्ये सहभागी होऊन आग विझविण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले. वाळपई अग्निशमन दलाची यंत्रणा मोर्ले या ठिकाणी तैनात करून ठेवलेली आहे . यदाकदाचित आगीचा वणवा पुन्हा भडकल्यास अग्निशामक दलाचे जवान तातडीने डोंगरावर जाऊन मदत कार्यामध्ये सहभागी होणार आहेत.

साटे, देरोडे नव्याने आग
दरम्यान प्राप्त झालेल्या माहितीनुसार नगरगाव पंचायत क्षेत्रातील साटे व दरोडे या भागांमध्ये नव्याने आग लागण्याच्या प्रकार घडला. सध्यातरी सदर आग पूर्णपणे आटोक्मयात आणलेली आहे. यासाठी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत दोन हेलिकॉप्टरमधून पाण्याचा फवारा मारून आग विझविलेली आहे. चार दिवसापूर्वी साटे येथील दिपाजी राणे गडाच्या डोंगरावर आगीचा वणवा सुरू झाला होता. जवळपास चार दिवस हा वणवा पेटत होता. वनखात्याच्या कर्मचाऱ्यांबरोबरच ग्रामस्था?नी विशेष प्रयत्न करण्यात आल्यानंतर चार दिवसांनी ही आग आटोक्मयात आणण्यात आली होती. त्यानंतर दरोडे या ठिकाणी आगीचा वणवा निर्माण झाला होता. दोन दिवसापासून सदर भागातील ग्रामस्थ व वनखात्याचे कर्मचारी सदर आग विझवण्यात महत्त्वाचे योगदान देत आहे. आजही अशाच प्रकारे ग्रामस्था?नी वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी आग विझविण्यास काम पुन्हा एकदा हाती घेतले. मात्र या ठिकाणी नव्याने आग लागण्याचा प्रकार घडला. त्या ठिकाणी सुद्धा आग विझविण्यात आलेली आहे.
वेगवेगळ्या ठिकाणी वन खात्याचे कर्मचारी तैनात.
दरम्यान यासंदर्भात मिळालेल्या अधिक माहितीनुसार वेगवेगळ्या ठिकाणी वन खात्याचे कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत. यासाठी अनेक तुकड्या करण्यात आलेले आहेत. जवळपास दीडशे पेक्षा जास्त वनकर्मचारी वेगवेगळ्या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी आग विझविण्यात आली असली तरीसुद्धा सुक्मया लाकडांना अजूनही आगीची धग आहे. ही आग पूर्णपणे विझवायची असेल तर पाण्याची गरज आहे .मात्र सदर भागांमध्ये पाणी नेणे कठीण आहे .यामुळे वन खात्याच्या कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले असून ते सुक्मया लाकडांची आग विझविण्याचा प्रयत्न करीत आहेत. याबाबत वनखात्याच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या तीन दिवसापासून घनदाट जंगलामध्ये वनखात्याचे कर्मचारी पहारा देत आहेत. गोव्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारचा विशिष्ट प्रकार घडलेला आहे. यामुळे वनखात्याची यंत्रणा पूर्णपणे सतर्क झालेली आहे. पूर्ण क्षमतेने वनखात्याचे कर्मचारी काम करत असून येणाऱ्या काही दिवसात सुद्धा सदर वनकर्मचारी तैनात ठेवण्यात येणार असल्याचे यावेळी सदर अधिकाऱ्यांनी सांगितले.
आमदार डॉ. देविया राणे यांनी केले ग्रामस्थांचे कौतुक.
दरम्यान मुख्यमंत्री प्रमोद सावंत व आरोग्यमंत्री विश्वजीत राणे आमदार डॉ. देविया राणे यांनी मोर्ले या ठिकाणी मोर्ले गडावर आगीच्या संदर्भात घेतलेल्या बैठकीनंतर ग्रामस्था?ना आग विझण्यासाठी आवाहन केले होते. या आवाहनाला अनुसरून बुधवारी दिवसभर सदर भागातील तऊण या कार्यामध्ये सहभागी झाले होते. सामाजिक स्वरूपाची जबाबदारी स्वीकारून तऊणांनी दिलेले योगदान याचे आमदार डॉ. देविया राणे यांनी कौतुक केलेले आहे. या संदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की सत्तरी तालुक्मयामध्ये विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक नागरिकांनी आपल्यापरीने सरकारचे यंत्रणा बळकट करण्याचा प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे. मोर्ले येथील तऊणांनी एक वेगळा प्रकारचा आदर्श दाखवून दिलेला आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.
अग्निशामक दलाची यंत्रणा सज्ज
मोर्ले सत्तरी येथील डोंगरावर लागलेली आग सध्यातरी विझलेली आहे. तरीसुद्धा खबरदारीची उपायोजना म्हणून वाळपई अग्निशामक दलाचे यंत्रणा मोर्ले या ठिकाणी सज्ज करण्यात आलेली आहे.कोणत्याही क्षणी यदाकदाचित आग लागण्याचा प्रकार घडल्यास अग्निशामक दलाचे जवान डोंगरावर जाऊन आग विझवण्याच्या कार्यामध्ये सहभागी होणार आहेत असे यावेळी अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले.
सुरल गावामध्ये आगीचा वणवा.
दरम्यान या संदर्भात मिळालेल्या अधिक माहितीनुसार सुरला या जुन्या गावांमध्ये आगीचा तांडव सुरू झालेला आहे .सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात आग दिसत असून या संदर्भात ग्रामस्था?नी वनखात्याच्या यंत्रणेशी संपर्क साधलेला आहे. ज्या ठिकाणी आग लागलेली आहे. त्या ठिकाणी सुरला गावातील लोकवस्ती होती. मात्र कालांतराने सदर लोकवस्ती सध्याच्या ठिकाणी स्थलांतर करण्यात आलेली आहे . ज्या ठिकाणी आग लागली आहे सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात काजूची लागवड आहे .यामुळे आगीचे तांडव नियंत्रणांना आल्यास मोठ्या प्रमाणात काजू बागायतीची नुकसानी होण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही.