CIRKUS : चित्रपट निर्माता रोहित शेट्टीने ( Rohit Shetti ) त्याच्या आगामी चित्रपट सर्कसचा ( Cirkus ) टीझर पोस्ट केला आहे. आपल्या बहूचर्चित चित्रपटची पहिली झलक त्याने इन्स्टाग्राम या सोशल मिडिया साईटवर शेअर केली. रोहितने या पोस्टमध्ये एक मोशन पोस्टर शेअर केले असून यामध्ये चित्रपटातील विचित्र पात्रांची झलक पहायला मिळत असून टीझरमध्ये रंगीबेरंगी कार, गाड्या आणि मुखवटे यांची रेलचेल दिसत आहे.
आपल्या चित्रपटसृष्टीतील करीयरमध्ये पहिल्यांदाच रणवीर सिंगने ( Ranveer Sing) डबल रोल साकारला आहे. यामध्ये रणवीरच्या एका व्यक्तीरेखेचे केस व्यवस्थित तर दुसऱ्याचे केस विस्कटलेले आहेत. पूजा हेगडेने पिवळ्या रंगाची साडी मॅचिंग ज्वेलरी घातली आहे.
जॅकलीन फर्नांडिससु्ध्दा या चित्रपटात असून ती एका रेट्रो लुक मध्ये दिसते. वरुण शर्मा सुध्दा दुहेरी भूमिकेत असून तो एका वेगळा लूकमध्ये दिसत आहे. कॉमेडचा हुकमी एक्का मानला जाणारा जॉनी लिव्हर सुध्दा एका हटके लुकमध्ये दिसत आहे. ही पोस्ट शेअर करताना, रोहितने “पुढच्या आठवड्यात ट्रेलर उतरण्यापूर्वी, आमच्या CIRKUS कुटुंबाला भेटा..!” असे कॅप्शन दिले आहे.