शिरोळ प्रतिनिधी
येथील नगर परिषदेकडे कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने कुरुंदवाडचे मुख्याधिकारी आशिष चौहान यांच्याकडे तात्पुरता पदभार देण्यात आला आहे. तसेच संवर्गातील विविध 15 पदे मंजूर असताना दहा कार्यरत आहेत तर पाच रिक्त पदे अद्याप भरली नसल्याने कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचाऱ्यावरचा कामाचा ताण वाढला आहे. संबंधित विभागाचे अधिकारीच नसल्याने विविध कामे प्रलंबित आहेत. शासनाने तातडीने नगरपरिषदेची रिक्त जागा भरावेत अशी मागणी नागरिकातून होत आहे.
शिरोळ नगर परिषदेकडे एकूण संवर्गातील विविध 15अधिकाऱ्यांची मंजुरी आहे. त्यापैकी सध्या दहा अधिकारी कार्यरत आहेत. शहरातील नागरिकांना बांधकाम परवानगीसाठी एक नगररचना अधिकारी, दोन बांधकाम अभियंता,ब व क अधिकाऱ्यांची जागा रिक्त असल्याने बांधकाम परवानाच्या कामांना विलंब होत आहे. जयसिंगपूर नगर परिषदेचे नदाफ यांच्याकडे अतिरिक्त कारभार सोपविण्यात आला आहे तसेच अग्निशामक सेवा पुरवणारे,दोन नगररचना अधिकारी,तसेच संगणक अभियंत्याची नियुक्ती अद्याप करण्यात आलेली नाही.
गेल्या तीन महिन्यापासून शिरोळ नगर परिषदेकडे कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने अनेक कामांना अडचणी येत आहेत. कुरुंदवाडचे मुख्याधिकारी आशिष चौहान यांच्याकडे तात्पुरता पदभार देण्यात आला आहे. शिरोळ शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन रिक्त जागा भराव्यात,शहरात उपनगराची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. शासनाने रिक्त जागा भरली नसल्याने अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. सध्या बांधकाम परवान्यासाठी अनेक नागरिकांनी मागणी केली आहे.तरूण भारत संवादच्या प्रतिनिधींनी कार्लयीन निरीक्षक संदिप चुडमंगे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.
Related Posts
Add A Comment