सण समारंभ किंवा एखाद्या कार्यक्रमात सुंदर दिसण्यासाठी प्रत्येकजण मेहनत घेत असते. मग कधी कधी महिला पार्लरचा देखील पर्याय निवडतात.पण आज आम्ही तुम्हाला मेकअप च्या का सोप्या टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला झटपट आणि सुंदर लूक घरच्या घरी मिळू शकतो. त्यासाठी तुम्ही खालील सोप्या मेकअप टिप्स फॉलो करू शकता.
मेकअप करण्यापूर्वी चेहरा आणि मान पूर्णपणे स्वच्छ धुवा. यासाठी फेसवॉश किंवा क्लिन्जरने चेहरा स्वच्छ करा.
चेहऱ्यावर फाउंडेशन लावण्यापूर्वी प्राइमर लावा. ते त्वचेला मॉइश्चरायझ करते आणि फाउंडेशन अधिक काळ टिकण्यास मदत करते.
चेहऱ्यावर नॉर्मल मेकअप दिसण्यासाठी तुम्ही बीबी किंवा सीसी क्रीम लावू शकता. असे केल्याने त्वचेला हलके कव्हरेज मिळते. फाउंडेशन लावताना चेहऱ्यावर चांगले ब्लेंड करा आणि कन्सीलर लावा.
डोळ्यांवर हलका मेकअप हवा असेल तर गुलाबी रंगाची आयशॅडो लावा. हे जवळजवळ सर्व कपड्यांशी जुळते. आता काजळ आणि आयलायनरच्या मदतीने डोळ्यांचा मेकअप पूर्ण करा. शेवटी, मस्करा लावा.
गालावर ब्लश लावण्यासोबतच हनुवटीजवळ, नाकाजवळही थोडे ब्लश लावा.
कपड्यांशी जुळणारी लिपस्टिक लावून तुमचा लुक पूर्ण करा. तुमच्या स्किन टोननुसार तुम्ही गुलाबी, ब्राउन, लाल शेडची लिपस्टिक लावू शकता.
Related Posts
Add A Comment