Tips for soft hand : हिवाळ्यात त्वचेच्या बऱ्याच समस्या जाणवू लागतात. पण अशावेळी जास्तीत चेहऱ्याची काळजी घेतली जाते.पण अशावेळी आपल्या हातांची देखील अतिरिक्त काळजी आवश्यक आहे. हिवाळ्यात हात मऊ ठेवण्यासाठी काय करावे ते जाणून घेऊयात.
त्वचेला हायड्रेट करण्यासाठी आणि ओलावा कमी होण्यापासून रोखण्यासाठी दररोज आपल्या हातांना मॉइश्चरायझर लावा. तसेच आंघोळीनंतर बॉडी लोशन लावावे.
हिवाळ्यात अंघोळीपूर्वी हाताला तेल लावा.यामुळे साबण आणि गरम पाण्याच्या प्रभावापासून आपल्या हातांचे संरक्षण करते.
त्वचेवर जमा झालेल्या मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यासाठी नियमित एक्सफोलिएशन महत्वाचे आहे. त्वचेवर हे लावल्यावर आणि हलक्या हाताने चोळल्यावर स्क्रबच्या वापरासह एक्सफोलिएशन केल्याने मृत पेशी प्रभावीपणे काढून टाकण्यास मदत होते. ओट्स, ग्रीन टी, तूप, साखर, दालचिनी पावडर आणि मध, बदाम आणि दही – हे चांगले एक्सफोलिएटर आहेत
कधीही बाहेर जाण्यापूर्वी हातावर सनस्क्रीन लावायला विसरू नका.
थंड हवेमुळे हात सहज कोरडे होऊ शकतात. तुम्ही जेव्हाही बाहेर जाता तेव्हा हातमोजे घालावेत.
Previous Articleमराठी चित्रपटांना तीन महिन्यात अनुदानाचे वितरण
Next Article ‘सीईटी’चे संभाव्य वेळापत्रक जाहीर
Related Posts
Add A Comment