Saree Fashion: आजकाल साडी आणि जॅकेटच्या ट्रेंड ची चलती आहे.पार्टी किंवा ऑफिसमध्ये हा लुक क्लासी दिसतो.त्याचबरोबर हिवाळा सुरू झाला आहे. हिवाळ्यात साडीसोबत कोणते हिवाळ्यातील कपडे घालायचे असा महिलांना प्रश्न पडलेला असतो. म्हणूनच आज आपण विंटर वेअरमध्ये स्टायलिश दिसण्यासाठी कशाप्रकारे साडी स्टाइल करता येईल हे जाणून घेणार आहोत.
लांब कोट
हिवाळ्याच्या दिवसात तुम्हाला जर एखाद्या पार्टीला जायचं असेल तर तुम्ही साडीसोबत लांब कोट कॅरी करू शकता.यामुळे तुमचा लुक रॉकिंग दिसू शकतो. शिवाय कोणत्याही लाईट रंगाच्या पार्टीवेअर साडीसोबत काळा,राखाडी किंवा चेरी कलरचा लांब कोट तुम्ही घालू शकता. अगदी तुमची साडी प्लेन आणि कोणतीही डिसाईन नसलेली असेल तरीही त्यावर हा कोट खूप सुंदर दिसेल
टर्टल नेक स्वेटर
थंडीच्या दिवसात टर्टल नेक स्वेटर खूपच उपयोगी पडते. कोणत्याही कॉटनच्या साडीसोबत तुम्ही टर्टल नेक स्वेटर हे ब्लॉउज म्हणून कॅरी करू शकता.यामुळे तुम्ही सुंदर तर दिसलाच पण थंडीपासून संरक्षणही मिळेल.याशिवाय कोणत्याही साडीवर काळ्या रंगाचा स्वेटर मॅच होऊ शकतो.पार्टीसाठी किंवा ऑफिससाठी हा लुक परफेक्ट आहे.

ब्लेझर
ऑफिससाठी तुम्हाला जर साधा पण स्टायलिश लुक करायचा असेल तर तुम्ही साडीसोबत ब्लेझरही कॅरी करू शकता. याच्या मदतीने तुम्ही साडीचा पल्लू मफलरप्रमाणे गळ्यातही बांधू शकता. आणि जर त्यावर त्यावर बेल्ट लावला तर तुमचा लुक अजूनच सगळ्यात उठून दिसेल.

श्रग
लग्नसमारंभ किंवा इतर कार्यक्रमात साडीसोबत श्रग घालणे हा एक उत्तम पर्याय आहे. शिवाय श्रगचे वजन हलके असल्याने तुम्ही तो सहज कॅरी करू शकता. हलक्या रंगाच्या साडीसोबत तुम्ही गडद रंगाचा श्रग घालू शकता.किंवा तुमची जर साडी खूपच चमकदार असेल तर साडीच्या काठानुसार किंवा मॅचिंगनुसार श्रग तुम्ही शिवून घेऊ शकता.
