बेळगाव प्रतिनिधी– गेल्या अनेक वर्षांपासून ग्राम पंचायतमध्ये बिल कलेक्टर म्हणून आम्ही काम करत आहे. सरकारच्या नियमानुसार आम्हाला बढती दिली पाहिजे. मात्र बढती देण्यास टाळाटाळ सुरू असल्यामुळे जिल्ह्यातील ग्राम पंचायत कर्मचार्यांनी जिल्हा पंचायतसमोर धरणे आंदोलन छेडून निदर्शने केली. आम्हाला बढती संदर्भात लेखी पत्र द्या, तेंव्हाच आंदोलन मागे घेवू म्हणून कर्मचार्यांनी दिवसभर ठाण मांडली. ग्राम पंचायतमध्ये 18 ते 20 वर्षे बिल कलेक्टर तसेच इतर कामे करणार्या कर्मचार्यांना सरकारने बढती देण्याचे आदेश दिले होते. मात्र कोरोना काळात हि प्रक्रिया थांबविण्यात आली होती. त्यानंतर सरकारने नियमानुसार आम्ही तुम्हाला बढती देवू, असे सांगितले होते. याबाबत जिल्हा पंचायतच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी यादी तयार झाल्याचे सांगितले होते.
15 सप्टेंबर रोजी हि यादी प्रसिध्द करण्यात येणार होती. मात्र ती प्रसिध्द केली गेली नाहि. त्यामुळे या कर्मचार्यांनी हे आंदोलन छेडले आहे. सरकारचाच आदेश आहे त्यानुसार हि बढती प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे. मात्र टाळाटाळ करत असल्यामुळे हे आंदोलन छेडण्यात आले आहे. यावेळी जे. एम. जैनेखान, यल्लाप्पा नाईक, दुंडाप्पा भजनाईक, मल्लाप्पा आलूर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
Previous Articleतब्बल दहा दिवसानंतर पाणीपुरवठा
Next Article पद्मश्री सतीश आळेकर यांना भावे पुरस्कार जाहीर
Related Posts
Add A Comment