हैद्राबाद / वृत्तसंस्था
तेलंगणातील आस्वारावपेट या खेडय़ात एका वनवासी वधूने तिची अधिक हुंडय़ाची मागणी मान्य न केली गेल्माने विवाह र्मडपातच विवाह मोडल्याची घटना घडली आहे. येथील वनवासी समाजात नवऱयाने नवरीला हुंडा देण्याची पद्धत आहे. प्रथम वधूने 2 लाख रुपयांहून अधिक रकमेची मागणी हुंडा म्हणून केली होती. ती मागणी मान्य करण्यात येऊन रक्कम देण्यात आली. मात्र विवाह मंडपात वधूने अधिक हुंडय़ाची मागणी केली. ती अमान्य करण्यात आल्याने तिने मंडपातच विवाहास नकार दिला. यामुळे विवाहाचा समारंभ रद्द करण्यात आला. वराच्या बाजूकडून ऐनवेळी अधिक हुंडय़ाची मागणी झाल्याने विवाह मोडल्याच्या घटना अनेकदा घडतात. मात्र, या खेडय़ात याच्या उलटा प्रकार घडल्याने तो चर्चेचा विषय झाला आहे. ही घटना दुर्मिळ असल्याचे बोलले जात आहे.