प्रतिनिधी/कुदनूर
होसूर (ता. चंदगड) येथील रहिवासी आणि न्यू कॉलेजचे माजी ग्रंथपाल प्रा. पांडुरंग चुडाप्प्पा पाटील उर्फ पी. सी. पाटील (वय ८०) यांचे कोल्हापूर येथे वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
प्रा. पाटील यांनी खेडूत शिक्षण मंडळ, कालकुंद्रीचे संचालक, सर्वोदय शिक्षण संस्था, कोवाडचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक तसेच शिवाजी विद्यापीठ सिनेट मेंबर म्हणून काम पाहिले आहे. याशिवाय त्यांचे कोल्हापूर जिल्ह्यातील दुर्गम अशा चंदगड तालुक्याच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या निधनामुळे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. आज (शनिवारी) सायंकाळी चार वाजता शोकाकुल वातावरणात कोल्हापूर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.