पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांचे आज दुबईतील अमेरिकन हॉस्पिटलमध्ये निधन झाले. मृत्युसमय़ी ते ७९ वर्षांचे होते. त्यांचे पार्थिव पाकिस्तानाला परत आणले जाणार आहे की नाही याबाबत अधिकृत खुलासा झालेला नाही. गेल्या महिन्य़ापासून ते आजारी होते त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना मायदेशी आणण्याचा प्रयत्न केला होता.
एमायलोइडोसिस नावाच्या दुर्धर आजारामुळे मुशर्रफ यांचे अनेक अवयव निकामी झाले होते. हा रोग संयोजी ऊती आणि अवयवांना प्रभावित करून त्यांच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण करतो.
कारगिल युद्धामागे परवेझ मुशर्रफ यांचाच हात असल्याचे मानले जाते. 2007 मध्ये माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्या हत्या प्रकरणात पाकिस्थानमधून त्यांना नागरिकांच्या रोषाला बळी पडावे लागले होते. पाकिस्तानपासून विभक्त झालेले मुशर्रफ गेल्या आठ वर्षांपासून दुबईत राहत होते. आपले उर्वरित आयुष्य आपल्या मायदेशात व्यतीत करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती.
1999 मध्ये यशस्वी लष्करी उठावानंतर परवेज मुशर्रफ हे पाकिस्तानचे दहावे राष्ट्रपती ठरले. त्यांनी 1998 ते 2001 पर्यंत पाकिस्तानचे 10 वे अध्यक्ष जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमिटी (CJCSC) आणि 1998 ते 2007 पर्यंत 7 वे सर्वोच्च जनरल म्हणून काम केले.
Previous Articleनिरवडे गावची बुवा गौरी पारकर हिची आणखी एक चमकदार कामगिरी
Related Posts
Add A Comment