नवी दिल्ली- पीटीआय
मेघालयातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर राज्यातील राजकिय घडामोडींना वेग आला असून राज्याच्या सत्ताधारी नॅशनल पीपल्स पार्टीच्या दोन आमदारांसह इतर पक्षाच्या चार आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप ईशान्येकडील राज्यात आपल्या राजकिय जोडणी लावत आहे.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. ईशान्य भागातील प्रदेशासाठी पक्षाचे निर्देशक आहेत, यावेळी बोलताना ते म्हणाले की, “अनुभवी आणि जेष्ठ अशा चार आमदारांच्या राजकीय प्रवेशामुळे या राज्यात भाजपसाठी नवीन सुरुवात ठरेल. यापुर्वी 2018 च्या निवडणुकीत 60 सदस्य संख्या असलेल्या विधानसभेत फक्त दोन जागा जिंकू शकले.”