युक्रेनमध्ये वार्तांकन करत असताना जवळच कोसळले क्षेपणास्त्र
@ कीव्ह / वृत्तसंस्था
युक्रेनमध्ये थेट वार्तांकन करणारा एक प्रेंच पत्रकार रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यातून थोडक्यात बचावला. रिपोर्टर पॉल गॅसनियर हा पत्रकार ‘टीएमसी’ या टीव्ही न्यूज चॅनेलवरील ‘कोटिडियन’ या कार्यक्रमाचे लाईव्ह रिपोर्टिंग करत असताना ही घटना घडली. वार्तांकन सुरू असताना रशियाने डागलेले क्षेपणास्त्र त्याच्या काही मीटर मागे कोसळले. क्षेपणास्त्र पडताच काही क्षणात मोठा आवाज होऊन स्फोट झाला. मात्र, सुदैवाने पत्रकार आणि कॅमेरामन सुरक्षित असल्याचे युपेनमध्ये वृत्तांकन करणाऱया अनास्तासिया मागाजोवा यांनी स्पष्ट केले आहे.
रशियाने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अचानक झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याने पत्रकार पॉल गॅसनियर घाबरला आणि जीव वाचवण्यासाठी धडपड करू लागल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. सदर पत्रकार डोनेस्तक प्रांतातील ड्रुझकिव्का शहरात रिपोर्टिंग करत होता. यादरम्यान त्यांच्या मागे सुमारे 200 मीटर अंतरावरील हॉटेल आणि आईस हॉकी मैदानावर क्षेपणास्त्र पडले. या हल्ल्यात आणखी दोन जण जखमी झाले आहेत.
‘टीएमसी’ या टीव्ही न्यूज चॅनेलवरील ‘कोटिडियन’ कार्यक्रमात फ्रान्सचे अर्थमंत्री ब्रुनो ले मायर हे प्रमुख पाहुणे होते. क्षेपणास्त्राचा स्फोट पाहून ब्रुनोसह संपूर्ण प्रेक्षकांना धक्काच बसला. काही वेळाने पत्रकार पॉल दुसऱया ठिकाणाहून शोमध्ये लाईव्ह झाल्यानंतर त्याने क्षेपणास्त्र हल्ल्याची ही घटना स्वतः प्रेक्षकांना सांगितली.
2022 मध्ये रशिया-युपेन युद्धाचे वार्तांकन करताना आठ पत्रकारांचा मृत्यू झाल्याची नोंद झालेली आहे. यापैकी पाच पत्रकारांना मार्च महिन्यातच जीव गमवावा लागला.