वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
क्रोएशियातील झाग्रेब येथे सुरू असलेल्या विश्व टेबल टेनिस स्पर्धेत भारताचा टेनिसपटू जी. साथियानचे एकेरीतील आव्हान उपांत्यपूर्व फेरीत समाप्त झाले. चायनीज तैपेईच्या चुआंग युआनने साथियानचा पराभव करत उपांत्य फेरीत स्थान मिळविले.
शनिवारी झालेल्या पुरूष एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात 18 व्या मानांकित चुआंग युआनने 34 व्या मानांकित साथियानचा 11-7,. 11-9, 11-5 असा पराभव केला. या स्पर्धेत साथियानने पहिल्या सामन्यात स्लोव्हेनियाच्या 16 वर्षीय जॉर्जिकचा तर त्यानंतर दुसऱया सामन्यात चीनच्या चेन युनायूचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला होता. आगामी होणाऱया बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारतीय टेबल टेनिस संघामध्ये जी. साथियानचा समावेश करण्यात आला असून ही स्पर्धा 28 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान होणार आहे.