क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
अर्जुन स्पोर्ट्स क्लब आयोजित टेनिस बॉल प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे स्पोर्ट्स ऑन संघाचे गजानन जैनोजी यांना पाचव्या संघमालकाचा मान मिळाला आहे.
सीपीएड मैदानावर होणाऱ्या बेळगाव टेनिस बॉल क्रिकेट प्रिमियर लीग स्पर्धेसाठी स्पोर्ट्स ऑन हा संघ या स्पर्धेत सहभाग होणार आहे.या स्पर्धेचे प्रमुख पुरस्कर्ते मुरगेंद्रगौडा पाटील यांच्या हस्ते पुंडलिक जैनोजी यांचे स्वागत केले. यावेळी परशराम पाटील, संदीप चव्हाण व प्रसाद नाकाडी उपस्थित होते. 12 संघात होणाऱ्या स्पर्धेसाठी टेनिसबॉल क्रिकेटपटुंना आवाहन करण्यात आले आहे. तरी या स्पर्धेचा खेळाडूंनी लाभ घ्यावा.