खाकी वर्दीतही दिसला भक्तीचा जागर
प्रतिनिधी /बेळगाव
गणेशोत्सवात पोलीस दलावर बंदोबस्ताचा मोठा ताण असतो. या ताणतणावातही प्रत्येक पोलीस स्थानकात गणरायाची प्रति÷ापना केली जाते. शहरातील बहुतेक पोलीस स्थानकात बुधवारी श्रींची प्रति÷ापना झाली असून भक्तीचा जागरही होत आहे.
पुणे-मुंबईनंतर बेळगावात गणेशोत्सवाचा मोठा थाट असतो. त्यामुळे साहजिकच पोलीस दलावर बंदोबस्ताचा ताण असतो. कोणत्याही सणात त्यांना कुटुंबीयांसमवेत सण साजरा करता येत नाही. घाईगडबडीत पुन्हा बंदोबस्तासाठी हजर व्हावे लागतेच. गणेशचतुर्थी असली तरी गेल्या पंधरवडय़ापासून बंदोबस्ताची तयारी सुरू आहे.
खडेबाजार, मार्केट, वाहतूक दक्षिण व उत्तर, काकती, बेळगाव ग्रामीण, माळमारुती, हिरेबागेवाडी, मारिहाळसह बहुतेक पोलीस स्थानकात बुधवारी श्रींची प्रति÷ापना करण्यात आली. पोलीस पारंपरिक वेशात सहभागी झाले होते. महिला पोलिसांनीही पारंपरिक वेशभूषेत गणरायाला आरती ओवाळून स्वागत केले.
पाच किंवा सात दिवस पोलीस स्थानकात गणेशोत्सव साजरा केला जातो. या काळात महाप्रसादाचे आयोजन केले जाते. आपल्या पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना बोलावून त्यांना महाप्रसादाचे वितरण केले जाते. फटाक्मयांची आतषबाजी व वाद्यांच्या गजरात पोलीस आगमन सोहळय़ात सहभागी झाले होते.