हैदराबादमधील हॉटेलची अनोखी ऑफर
लॉकडाउन संपल्यापासून ऑनलाईन फूड ब्लॉगर्सनी स्वतःचे व्हिडिओ शेअर करण्यास सुरुवात केली आहे. हे लोक स्ट्रीट फूड आयटम्सपासून फाइव्ह स्टार हॉटेल्सचे व्हिडिओ तयार करून शेअर करतात. अलिकडेच हैदराबादच्या एका रेस्टॉरंटने लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी एक अनोखी ऑफर दिली आहे.
या रेस्टॉरंटचे चॅलेंज आतापर्यंत अनेक फूड ब्लॉगर्सनी शूट करत ऑनलाइन शेअर केले आहे. ही काही साधीसरळ स्पर्धा नाही. यात संबंधिताला रेस्टॉरंटची बाहुबली थाळी संपवावी लागणार आहे. परंतु एका अटीसह.
या नव्या चॅलेंजमध्ये बाहुबली थाळी संपवून एक लाख रुपयांचे इनाम मिळविता येणार आहे. बाहुबली थाळीत एकूण 30 शाकाहारी आणि मांसाहारी खाद्यपदार्थ असतील. यात चिकन बिर्याणीपासून प्रॉन करी, शेजवान नूडल्स आणि रायत्यापासून सॅलड आणि ड्रिंक्सही मिळणार आहे. परंतु केवळ ही थाळी फस्त करून लाखाचे मानकरी होता येत नाही. ही थाळी केवळ अर्ध्या तासात संपविण्याची आहे.
थाळीची किंमत
हैदराबादच्या फूड जॉइंटने ही ऑफर सुरू केली आहे. यात थाळीची किंमत 1800 रुपये ठेवण्यात आली आहे. 1800 रुपयांची थाळी अर्ध्या तासात फस्त केल्यास 1 लाख रुपयांचे इनाम प्राप्त करता येणार आहे. यात शाकाहारी आणि मांसाहारी खाद्यपदार्थ मिळणार आहेत. हे फूड चॅलेंज व्हायरल होताच अनेक लोकांनी ते जिंकण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये धाव घेतली आहे. आतापर्यंत हे चॅलेंज कुणालाच पेलता आलेले नाही.