पन्हाळा तालुक्यातील महावितरणच्या कळे उपविभागात जनमित्रांच्या सत्कार समारंभप्रसंगी अतिरिक्त कार्यकारी अभियंता केदारनाथ साळी, डॉ. कारंडे, उपविभागीय अभियंता सचिन पाटणकर
कोल्हापूर प्रतिनिधी
केंद्रशासनाने 04 मार्च रोजी देश पातळीवर लाईनमन दिवसाचे आयोजन करून सर्वांना प्रकाशित ठेवणाऱ्यांवर प्रकाश टाकला. महावितरणात प्रकाशदूतांच्या गौरव सोहळ्यादिवशी कोल्हापूर जिह्यात कोल्हापूर ग्रामीण एक, कोल्हापूर ग्रामीण दोन, कोल्हापूर शहर,इचलकरंजी, जयसिंगपूर, गडहिंग्लज या विभागात विविध ठिकाणी अनोख्या उपक्रमासह सुरळीत वीजेसाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या जनमित्रांच्या कार्याचा सन्मान करून सुरक्षेचा जागर करण्यात आला. लोकप्रतिनिधी, नागरिक व ग्राहकांनी प्रत्यक्ष भेटी देऊन, सोशल मिडीयातूनही कौतुकाचा वर्षाव केला. या सन्मानामुळे जनमित्र भारावून गेले. सुरळीत व दर्जेदार वीजसेवेच्या संकल्पाला बळकटी देणारा हा दिवस ठरला.
कोल्हापूर शहर उत्तर विभागातील कार्यक्रमात मुख्य अभियंता परेश भागवत यांनी जनमित्रांशी दिलखुलास संवाद साधला. सेवानिवृत् अभियंता अशोक कुलकर्णी यांनी सुरक्षाविषयक प्रबोधन केले. यावेळी सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) शशिकांत पाटील, कार्यकारी अभियंता सुनिल माने, अतिरिक्त कार्यकारी अभियंता सातप्पा चौगुले उपस्थित होते. इचलकरंजी विभागात लाईनमन दिनी अधिक्षक अभियंता अंकुर कावळे, कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांनी मार्गदर्शन करून कौतुक केले. प्रसिध्द संवादक सोहन तिवडे यांनी जनमित्रांशी प्रेरणादायी संवाद साधला. यावेळी अतिरिक्त कार्यकरी अभियंता निरज आहुजा, राहुल पाटील, उपव्यवस्थापक (मानव संसाधन) सुहास वडणगेकर, उपव्यवस्थापक (लेखा) महेश खांडेकर मचावर उपस्थित होते. सुनिल कोळी, प्रसाद दिक्षित यांनी मनोगते व्यक्त केली. पन्हाळा उपविभागात अॅस्टर आधार हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने जनमित्रांसाठी आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. याप्रसंगी कार्यकारी अभियंता दिपक पाटील, उपवभागीय अभियंता अमोल राजे यांनी मार्गदर्शन केले. अॅस्टरचे समन्वयक आशिष काटे यांची उपस्थिती होती.
शाहूवाडी येथील कार्यक्रमात कार्यकारी अभियंता दिपक पाटील, उपवभागीय अभियंता अभय शामराज यांनी मार्गदर्शन केले. कळे उपविभागात पीकेज् युपिटर हॉस्पिटलच्या वतीने आरोग्य तपासणी शिबीर घेतले. यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता केदारनाथ साळी, डॉ. कारंडे, उपविभागीय अभियंता सचिन पाटणकर यांची उपस्थिती होती. कोल्हापूर शहर पश्चिम उपविभागात मानसोपचार तज्ञ प्रा.उर्मिला चव्हाण यांनी ताणतणावमुक्ती साठी उपाय सांगितले. उपविभागीय अभियंता विजय पाटील, उपकार्यकारी अभियंता मुकूंद आंबी यांनी मार्गदर्शन केले. उपविभागाने जनमित्रांना टोपीचे वाटप केले. जनमित्र सरिता थोरात यांनी सहक्रायांना पेन वाटप केले.
गडहिंग्लज उपविभागात कार्यकारी अभियंता विजयकुमार आडके, विद्युत निरिक्षक कार्यलयाचे सहाय्यक अभियंता वाघ यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता नागेश बसरकट्टी, उपविभागीय अभियंता सागर दांगट यांची उपस्थिती होती. जयसिंगपूर विभागात कार्यकारी अभियंता वैभव गोंदील, उपविभागीय अभियंता मदन कडाळे यांनी जनमित्रांचे कौतुक केले. सोलगे यांनी संवाद साधला. राधानगरी विभागात उपविभागीय अभियंता गिरिष भोसले यांनी जनमित्रांच्या महापूरातील कामाचे सचित्र कौतुक केले. सुरक्षाविषयक चित्रफिती प्रदर्शित केली.