पेडणेत नवचेतना युवक संघातर्फे आयोजन : संगीत क्षेत्रात मोठे योगदान : आमदार प्रवीण आर्लेकर
प्रतिनिधी /पेडणे
पेडणे तालुका ही कलाकारांची खाण आहे. या तालुक्मयात अनेक कलाकार असून त्यांनी संगीत, नाटय़, हस्तकला आदी कला जिवंत ठेवल्या आहेत. मात्र युवा पिढीचे आज काहीप्रमाणात दुर्लक्ष होत आहे. त्यामुळ या कला आजकाल मागे पडत आहेत. पण ती लोप पावत चाललेली कला जिवंत ठेवण्यासाठी अवघीच काही जुनी-जाणती कलाकार मंडळी झटत आहेत. त्यापैकी पेडण्यातले एक ज्ये÷ कलाकार व एक प्रामाणिक संगीत साधक सखाराम अनंत मालवणकर आहेत, त्यांचे संगीत क्षेत्रात मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन पेडणे मतदारसंघाचे आमदार व गोवा हस्तकला व लघुउद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष प्रवीण आर्लेकर यांनी केले.
श्री रामपुरुष दत्तगिरी मठ पेडणे येथे आयोजित केलेल्या ज्ये÷ व्हायोलिन वादक सखाराम अनंत मालवणकर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त गौरव सोहळय़ात ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. यावेळी पेडणे नगरपालिकेचे नगराध्यक्ष माधव सिनाई देसाई, नवचेतना युवक संघाचे अध्यक्ष कृष्णा पालयेकर, व्हायकाउंट हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेंद्र बोंदे, पत्रकार महादेव गवंडी, क्रीडाशिक्षक किशोर किनळेकर, चंद्रकांत सांगळे, विश्वास पालयेकर, आनंद नाईक आदी उपस्थित होते.
एका चांगल्या कलाकाराचा गौरव घडवून आणल्याबद्दल आयोजकांना मुख्याध्यापक राजेंद्र बोंदे यांनी शुभेच्छा दिल्या. नगराध्यक्ष माधव सिनाई देसाई यांनी सखाराम मालवणकरांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
सुरेखा किनळेकर यांनी स्वागत गीत सादर केले. स्वागत व प्रास्ताविक महादेव गवंडी यांनी केले. माधवी गवंडी, शांती किनळेकर, सुरेखा किनळेकर यांनी पुष्प देऊन मान्यवरांचे स्वागत केले. सूत्रसंचालन किशोर किनळेकर यांनी केले तर चंद्रकांत सांगळे यांनी आभार मानले.