सुंदर दिसणं कोणाला आवडत नाही. तुकतुकीत चेहरा ,ग्लोइंग स्किन याशिवाय सुंदरतेची व्याख्या परिपूर्ण होत नाही. चेहऱ्याला वरून काळजी घेण्यापेक्षा आतून निरोगी राहणं हे अधिक महत्त्वाच आणि गरजेचं असतं. सर्वप्रथम आतून निरोगी म्हणून महत्त्वाचा आहे त्यासाठी काही टिप्स बघुयात .
सकाळी उठल्या उठल्या दात घासण्यापूर्वी कोमट पाण्यात मध घेणे गरजेचे आहे.
मॉर्निंग ड्रिंकला ब्लॅक कॉफी ,सब्जा, ग्रीन टी हे सुद्धा चेहरा उजळण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपयुक्त आहे.
योग्य आहार जसं की पालेभाजी, अंडी ,फळे ,ड्रायफ्रूट्स शरीराला गरजेचे आहे.
याशिवाय काही घरगुती उपाय देखील जाणून घेऊयात. जे तुम्ही अगदी सहजतेने घरी असलेल्या वस्तूंपासून, पदार्थांपासून करू शकता.
बदाम तेल
बदाम तेलाचे चार ते पाच थेंब घेऊन चेहऱ्यावर आणि मानेवर पाच मिनिटे हलक्या हाताने मसाज करा हा मसाज करण्याआधी आपला चेहरा ताज्या पाण्याने स्वच्छ करायला विसरू नका.
कोरफड
कोरफड आणि सौंदर्याचे समीकरण खूप मिळतजुळत आहे. सौंदर्य फुलवण्यासाठी कोरफडीची खूप मदत होते. कोरफडीचा गर घेऊन चेहऱ्यावर रोज चार ते पाच मिनिटे मसाज करा कोरफडीच्या घरात तुम्ही गुलाब जल देखील टाकू शकता. उठल्या उठल्या सकाळी आंघोळीच्या आधी याचा मसाज करा.
घरगुती फेस पॅक
2 चमचे बेसन, चिमूटभर हळद, 1 चमचा गुलाबपाणी, 1 चमचा दूध एका बाऊलमध्ये मिसळून घ्या. हे पॅक चेहरा, गळा आणि इतर प्रभावित भागांवर लावा आणि 20 मिनिट तसेच राहू द्या. नंतर स्क्रब करत हटवा. आठवड्यातून दोनदा वापरा.
साखर आणि लिंबू
1 चमचा साखर, अर्धा चमचा ग्लिसरीन, 1 चमचा लिंबाचा रस मिसळून घ्या. स्क्रबप्रमाणे त्वचेवर मसाज करत लावा. 3 मिनिट स्क्रब करत राहा. नंतर पाण्याने धुऊन टाका. याने मृत त्वचा आणि टॅनिग दोन्हींपासून सुटका मिळेल.
मध आणि लिंबू
लिंबुच्या रसात मध मिसळून चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा. चेहरा तेजस्वी होईल.
केळ, पपई
घरी जास्त पिकलेले केळे किंवा पपई कुणाला जास्ती आवडत नाही त्यामुळे टाकून दिले जाते. पण टाकून न देता तसच ते चेहऱ्यावर १० ते १५ मिनिट पर्यंत रफ करावे.