कॅलिथे (ग्रीस) : बुधवारी येथे झालेल्या 2023 च्या इंटरनॅशनल जंपिंग स्पर्धेत भारताचा अॅथलिट मुरली श्रीशंकरने 8.18 मी. चे अंतर नोंदवत सुवर्णपदकाला गवसणी घातली. श्रीशंकर गेल्या वर्षी झालेल्या इंटरनॅशनल झंपिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवताना 8.31 मी. चे अंतर नोंदवले होते. ग्रीसमधील या स्पर्धेत श्रीशंकरची ही सर्वोत्तम उडी म्हणावी लागेल. मुरली श्रीशंकरने सहाव्या आणि शेवटच्या प्रयत्नात 8.18 मी. चे अंतर नोंदवत सुवर्णपदक नोंदवले. 2023 च्या अॅथलेटिक हंगामात श्रीशंकरची ही तिसरी स्पर्धा असून त्याने तिन्ही स्पर्धांमध्ये सुवर्णपदके मिळवली आहेत. मे महिन्यात अमेरिकेत व्हिस्टा येथे झालेल्या एमव्हीए अॅथलेटिक्स स्पर्धेत श्रीशंकरने 8.29 मी. चे अंतर नोंदवत सुवर्णपदक मिळवले होते. या क्रीडा प्रकारात श्रीशंकरची आतापर्यंतची 8.36 ही सर्वोत्तम कामगिरी आहे. गेल्या मार्चमध्ये तिसऱ्या इंडियन ग्रां प्रि स्पर्धेत त्याने लांब उडीत 7.94 मी. चे अंतर नोंदवले होते. ग्रीसमधील या स्पर्धेत जेस्वीन अल्ड्रीनने 7.85 मी. चे अतर नोंदवत रौप्य तर ऑस्ट्रेलियाच्या जॅलेन रुकेरने (7.80 मी.) कांस्यपदक मिळवले.
Previous ArticleSangli : नेर्लेत अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
Next Article उद्घाटन कोणी करावे ?
Related Posts
Add A Comment