प्रसिद्ध पंजाबी गायक आणि रॅपर सिद्धू मूसेवाला ( Siddhu Moosewala ) याच्या हत्येचा मुख्य सूत्रधार गोल्डी ब्रार ( Goldi Brarr ) ह्याला अमेरिकेतील कॅलीफोर्निया पोलीसांनी (California Police ) ताब्यात घेतले असून त्याच्या हस्तांतरासाठी कॅलीफोर्निया पोलीस भारत सरकार आणि पंजाब पोलिसांच्या संपर्कात आहे. या संबंधीची माहीती पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (CM Bagwant Mann) यांनी दिली. गेल्या मे महिन्यात गायक सिद्धू मूसवाला यांची निर्घृण हत्या झाली होती. या हत्ये मागील सूत्रधार, मोस्ट वाँटेड गँगस्टर गोल्डी ब्रार हा पंजाब पोलीसाच्या रडारवर होता.
गुजरात निवडणुकीच्या प्रचारासाठी अहमदाबादमध्ये असलेले मुख्यमंत्री मान यांनी अहमदाबाद येथे ही माहीती दिली. ते म्हणाले “ब्रार यांना कॅलिफोर्निया पोलिसांनी ताब्यात घेतले “मी तुम्हाला सांगतोय…कॅलिफोर्निया पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्यांनी भारत सरकार आणि पंजाब पोलिसांशी संपर्क साधला आहे. अमेरिकेबरोबर झालेल्या करारानुसार आम्ही गोल्डी ब्रारला नक्कीच भारतात आणू. ब्रार हा या खूनामागील मुख्य सूत्रधार असून इतरही अनेकजण या हत्याकांडामध्ये सामील आहेत. या सर्वांचे रेकॉर्ड पंजाब पोलीसांकडे आहे” असे ते म्हणले.
Previous Articleमुंबईत 2 जानेवारीपर्यंत जमावबंदी
Next Article हिवाळ्यात ओठांसाठी बनवा घरच्या घरी लीप बाम
Related Posts
Add A Comment