Gram Panchayat Election Results 2022 : कोल्हापूर जिल्ह्यातील पिंपळगाव खुर्द या एकमेव ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीने वर्चस्व राखले आहे. मुश्रीफ गटाचे शीतल नवाळे हे सरपंचपदी विराजमान झाले आहेत. शीतल नवाळे यांचा ३९८ मतांनी विजय झाला आहे. अकरापैकी आठ जागा राष्ट्रवादीला तर तीन जागांवर भाजपला समाधान मानवे लागले आहे.
राज्यातील शेकडो ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी काल रविवारी (ता. १८) मतदान झालं. तर आज त्याचा निकाल जाहीर झाला आहे. पहिल्यांदाच थेट नागरिकांमधून सरपंचाची निवड झाली आहे. त्यामुळे आज सकाळपासूनच बुथवर नागरीकांनी गर्दी केली होती. कोल्हापुरातील पिंपळगावात मुश्रीफ -मंडलिक गटाचे कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच हजेरी लावली. शीतल नवाळे विजयी होताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला.
Previous Articleहद्दवाढ म्हणजे काय रे भाऊ?
Next Article जिल्हा बँकेतील सोयीच्या राजकारणामुळे संघर्ष पेटणार
Related Posts
Add A Comment