Grand inauguration of open bhajan competition in Zholmbe–
झोळंबे गावातील भजन प्रेमी आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने माऊली मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या खुल्या भजन स्पर्धेचे शनिवारी सायंकाळी उशिरा थाटात उद्घाटन करण्यात आले.
भजन स्पर्धेचे उद्घाटन बांदा येथील प्रसिद्ध उदयोजक भाऊ वळंजू यांच्याहस्ते शशी पित्रे, सावंतवाडीचे माजी सभापती अशोक दळवी, माजी पंचायत समिती सदस्य नारायण राणे, विश्वास घाग, गजानन नाटेकर, माजी पंचायत समिती सदस्य गणेशप्रसाद गवस, झोळंबे सरपंच राजेश गवस, उपसरपंच पांडूरंग गवस, माजी सरपंच सातिश कामत, दादा परब, दाजी परब, परिक्षक विठ्ठल गवस, निलेश मेस्त्री, सुखाजी गवस, एन डी गवस आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जगदिश गवस सूत्रसंचालन संदिप गवस तर आभार संतोष वझे यानी मानले.शनिवारी रात्री आठ भजन मंडळानी आपले सादरीकरण सादरीकरण केले.
शनिवारी रात्री आठ भजन मंडळानी आपले सादरीकरण सादरीकरण केले. रविवारी सायंकाळी ५:४५ वाजल्यापासून श्री मुसळेश्वर भजन मंडळ (मळेवाड), श्री देव सावंत वस भजन मंडळ (इन्सुली), श्री आजोबा कल्चरल भजन मंडळ (केरी सत्तरी गोवा), श्री स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळ (कलंबिस्त), श्री रवळनाथ माऊली समर्थ प्रासादिक भजन मंडळ (कास), श्री माऊली भजन मंडळ (कोलझर), श्री गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (तुळस), श्री साई सातेरी आजोबा भजन मंडळ (केरी सत्तरी गोवा) या आठ मंडळाचे सादरीकरण होणार आहे. स्पर्धेचे पारितोषिक वितरण रविवारी रात्री १ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
ओटवणे / प्रतिनिधी