Gujarat Assembly Elections : अपक्ष म्हणुन निवडणुक लढवणाऱ्या ७ जणांना भाजप (BJP) गुजरात ने निलंबित केले असून या निलंबित उमेदवारंमध्ये २ विद्यमान आमदार आहेत. पक्षाने तिकीट न दिल्याने या उमादवारांनी अपक्ष म्हणुन अर्ज भरला होता. येत्या १ डिसेंबरला गुजरात विधानसभेसाठी निवडणुक होणार आहे.
भाजपचे माजा आमदार अरविंद लडाणी आणि हर्शद वसावा यांना सत्ताधारी पक्षाने तिकिट नाकारल्याने त्यांनी अनुक्रमे केशोद आणि अनुसुचित जमातीसाठी राखिव मतदारसंघ असलेल्या नांदोड या मतदारसंघातून अपक्ष अर्ज भरले होते. या दोन्ही मतदारसंघातून अनुक्रमे देवा आलम आणि दर्शना देशमुख यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. या दोन मुख्य उमेदवारांशिवाय वाघोड्यातून ६ वेळा आमदार राहीलेल्या मधू श्रीवास्तव आणि पदरा मतदारसंघातील माजी आमदार दिनेश पटेल यांनीही अपक्ष म्हणून अर्ज रादर केला आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशीही अर्ज मागे न घेतल्याने पक्षाविरूद्ध निवडणुक लढवणाऱ्या व्यक्तींना निलंबित करणे हा नियम असल्याने भाजपचे प्रदेशाध्याक्ष सी. आर. पाटील (C.R. Patil ) यांच्या निर्देशानुसार या सर्व उमेदवारांना निलंबित करण्यात आल्याचे एका निवेदनात भाजपने म्हटले आहे.
Previous Articleब्रेक फेल नव्हे तर ड्रायव्हरच्या ‘या’ चुकीमुळे झाला अपघात
Next Article राज्यपाल भगतसिंग कोश्यारीं चा बाचणीत निषेध
Related Posts
Add A Comment