तयारी पूर्ण : वाहन पार्किंग व्यवस्था कडोली-देवगिरी येथे : राहत्या ठिकाणीच नैवेद्य दाखविण्याचे आवाहन
वार्ताहर /कडोली
बेळगावसह संपूर्ण कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बेळगाव तालुक्यातील गुंजेनहट्टी येथे मंगळवारी होत असलेल्या श्री होळी कामाण्णा देवालयाच्या यात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून यात्रेतील वाढती गर्दी लक्षात घेऊन वाहनांची पार्किंग व्यवस्था कडोली आणि देवगिरी येथे केली आहे. तर यात्रेवर सीसी कॅमेराद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे.
सालाबादप्रमाणे धुलिवंदनानिमित्त गुंजेनहट्टी येथील जागृत देवस्थान श्री होळी कामाण्णा देवाची यात्रा यावर्षीही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. बेळगावसह महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा येथून लाखो भाविक येऊन आपले नवस फेडतात. गेली दोन वर्षे कोरोनाकाळ होता. त्यामुळे भाविकांची संख्या थोडी कमी होती. पण, यावर्षी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा अंदाज देवस्थान यात्रा कमिटीने व्यक्त केला आहे. यात्रा काळात भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व तयारी पूर्ण केली आहे. मंदिरापासून चोहोबाजूनी एकेक कि. मी. चे अंतर भाविकांनी व्यापलेले असते. शिवाय मंदिर परिसरातील रस्तेही भाविकांनीं फुलून गेलेले असतात. तेव्हा या ठिकाणी मंदिर परिसरात वाहने येवून भाविकांना नाहक त्रास होऊ नये यासाठी कडोली आणि देवगिरी गावाजवळ वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
स्वतंत्र ट्रान्स्फॉर्मरची उभारणी
मंदिर परिसरात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. शिवाय यात्रेवर सीसी कॅमेरांची नजर राहणार आहे, असे मंदिर प्रशासनाने सांगितले आहे. य् ाात्रा काळात वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी विद्युत पुरवठा मंडळाने खास यात्रेसाठी आणखी एक स्वतंत्र ट्रान्स्फॉर्मर बसविण्यात आला आहे. श्र् ााr होळी कामाला मंदिरासमोर एक भव्य शामियाना उभारण्यात आला असून मंदिरही विद्युत रोषणाईने आकर्षित करण्यात आले आहे.
सकाळी 9 वाजता भरयात्रेला प्रारंभ
य् ाात्रा दिवसा पार पाडावी या उद्देशाने देवस्थान पंच कमिटीने सकाळी लवकर श्री होळी कामाण्णा मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचे निश्चित केले असून सकाळी 9 वाजता भर यात्रेला सुरुवात होणार आहे. तेव्हा यात्रा सुरळीत आणि शांततेत पार पाडण्यासाठी सर्व भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन देवस्थान पंच कमिटीने केले आहे. शिवाय ज्या ठिकाणी भाविक राहतात. त्या ठिकाणीच नैवेद्य दाखवून पूजा करावी. नैवेद्य मंदिराकडे आणू नये, असे आवाहन देवस्थान पंच कमिटीने केले आहे.